वसमत तालुक्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; लोकांमध्ये भीतीचं वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 10:33 PM2024-10-25T22:33:29+5:302024-10-25T22:33:29+5:30
जमीन हादरताच नागरिक घराबाहेर पडले. हा धक्का तिव्रतेचा नव्हता. मात्र सतत भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांत भीती वाढत आहे.
वसमत (जि. हिंगोली) : तालुक्यातील पांगरा शिंदेसह काही गावांमध्ये २५ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३४ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.
तालुक्यात मागील काही दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के सातत्याने जाणवत आहेत.
२२ ऑक्टोबर रोजी सकाळी वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी या तालुक्यातील अनेक गावांत भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यावेळी नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे केंद्रबिंदू नोंद झाला होता. २५ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३४ वाजता भूगर्भातून आवाज येत जमीन हादरली आहे. या भुकंपाचा धक्का तालुक्यातील पांगरा शिंदे, कुरुंदा,वापटी,कुपटी,सिरळी,खांबाळा आदी गावांना बसला आहे. जमीन हादरताच नागरिक घराबाहेर पडले. हा धक्का तिव्रतेचा नव्हता. मात्र सतत भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांत भीती वाढत आहे. चार दिवसांत दोन वेळेस भुकंपाचा धक्का बसला आहे.