हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 12:45 PM2021-08-23T12:45:21+5:302021-08-23T12:48:48+5:30

Earthquake in Hingoli : कळमनुरी, औंढा तालुक्यांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत

Mild earthquake in Hingoli district | हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

Next
ठळक मुद्देकळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे भूकंपाचे दिवसभरात चार धक्के बसले

कळमनुरी /नांदापूर (जि. हिंगोली): कळमनुरी तालुक्यातील नांदापूर परिसरात रविवारी ( दि. २२ ) पहाटे ५.४७ वाजण्याच्या सुमारास, तर दुसरा भूकंपाचा धक्का सायंकाळी ७.१४ वाजण्याच्या सुमारास जाणवला. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. ( Mild earthquake in Hingoli district) 

कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव, हारवाडी, म्हैसगव्हाण, करवाडी, नांदापूर व औंढा तालुक्यातील जामगव्हाण, आमदरी, राजदरी, कंजारा, पिंपळदरी, सोनवाडी, येडुद, आदी गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवले असतानाही प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही, असे जामगव्हाण येथील माजी सरपंच सुरेश अप्पा मळसेटवार यांनी सांगितले.

यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कळमनुरी व औंढा या दोन तालुक्यांत भूकंपाचे धक्के बसले आहेत; परंतु ते किती रिश्टर स्केलचे झाले आहेत याची नोंद मात्र कळाली नाही.

सोडेगावात बसले चार धक्के...
कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे भूकंपाचे दिवसभरात चार धक्के बसल्याने ग्रामस्थ भयभीत होऊन घराबाहेर पडले होते. राखी पौर्णिमेचा सण असल्याने अनेकजण घरीच बसले होते. भूकंपाच्या सौम्य धक्क्याने मात्र नागरिकांची धावपळ उडाली.

Web Title: Mild earthquake in Hingoli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.