येत्या पाच दिवसांत किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:29 AM2021-02-10T04:29:55+5:302021-02-10T04:29:55+5:30
उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात उपलब्धतेनुसार व पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून ...
उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात उपलब्धतेनुसार व पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापासाठी ५ टक्के (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इसी २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के ४.५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
करडई पिकामध्ये उपलब्धतेनुसार व पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोट ३० टक्के १३ मिली किंवा असिफेट ७५ टक्के १० ग्राम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करुन हंगामी उसाची लागवड १५ फेब्रुवारीपर्यत करावी, असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.