लघुसिंचनच्या कार्यकारी अभियंत्यास नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:20 AM2018-04-11T01:20:03+5:302018-04-11T01:20:03+5:30

वारंवार सूचना देवूनही जलयुक्तच्या कामांना गती नाही. काही अधिकारी तर यात लक्षच घालत नाहीत. त्यामुळे गतवर्षीचीच कामे होत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये अशा अधिकाऱ्यांनी स्वत:च आढावा द्यावा, असे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी खडसावले. तर लघुसिंचनच्या कार्यकारी अभियंत्याचे एक दिवसाचे वेतन कापून नोटीस देण्यास सांगितले.

Minority Executive Engineer Notice | लघुसिंचनच्या कार्यकारी अभियंत्यास नोटीस

लघुसिंचनच्या कार्यकारी अभियंत्यास नोटीस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वारंवार सूचना देवूनही जलयुक्तच्या कामांना गती नाही. काही अधिकारी तर यात लक्षच घालत नाहीत. त्यामुळे गतवर्षीचीच कामे होत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये अशा अधिकाऱ्यांनी स्वत:च आढावा द्यावा, असे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी खडसावले. तर लघुसिंचनच्या कार्यकारी अभियंत्याचे एक दिवसाचे वेतन कापून नोटीस देण्यास सांगितले.
जलयुक्त शिवार योजनेचा व्हीसीद्वारे आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. यामध्ये जि.प.चा लघुसिंचन विभाग, स्थानिक स्तर विभाग कामेच करीत नसल्याचे आढळले. त्यातच जि.प. लघुसिंचनच्या कार्यकारी अभियंत्यांची गैरहजेरी तर जिल्हाधिकाºयांना चांगलीच खटकली. कामेही नाहीत अन् गैरहजरही राहील्याने ते संतापले होते. एकूण ८० गावांतील चित्र पाहता खर्चाचे प्रमाण अतिशय कमी आहे. तर पुढील दोन महिनेच हाती उरले आहेत. एकूण मंजूर असलेल्या २४७७ कामांपैकी ९१८ कामे पूर्ण झाली आहेत. त्यावर ६.५२ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तर ५१६ कामे नव्याने सुरू झाली असून, ती प्रगतीत आहेत. एकूण १६७० कामांच्याच निविदा निघाल्या होत्या. त्यात वरीलप्रमाणे चित्र असल्याने यंदा जलयुक्तची गती वाढविणे गरजेचे आहे.
जलयुक्तमध्ये कृषी विभागाला विविध प्रकारची १६३९ कामे मंजूर आहेत. त्यापैकी ८०८ कामे झाली. मात्र यातही ६०० ठिबक व तूषार संचाचीच कामे आहेत. वनविभागाच्या १५४ पैकी १०५ कामांमुळे चांगली स्थिती दिसून आली. जि.प.च्या लघूसिंचन विभागाला ८३ पैकी केवळ ५ कामे पूर्ण करता आली. भूजलसर्व्हेक्षण विभागाची रिचार्ज शाफ्टची ११४ कामे सुरू करता आली नाहीत. पाणीपुरवठा विभागाचीही हीच गत आहे. सिमेंटनाला बंधारे व नाला खोलीकरणाच्या ९७ कामांना अजूनही श्रीगणेशा नाही. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी चांगलाच संताप व्यक्त करून अधिकाºयांना धारेवर धरले.

Web Title: Minority Executive Engineer Notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.