अंधारात अंदाज चुकला अन् जीव गमावला, पुलाच्या खड्ड्यात दुचाकीसह दोघांना जलसमाधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 12:34 PM2023-03-28T12:34:05+5:302023-03-28T12:34:50+5:30

टोकाई ते गिरगाव रस्त्यावर पूल बांधण्याचे काम सुरु आहे

Miscalculation in the dark and loss of life, both of them drowned in the pit of the bridge along with the two-wheeler | अंधारात अंदाज चुकला अन् जीव गमावला, पुलाच्या खड्ड्यात दुचाकीसह दोघांना जलसमाधी

अंधारात अंदाज चुकला अन् जीव गमावला, पुलाच्या खड्ड्यात दुचाकीसह दोघांना जलसमाधी

googlenewsNext

वसमत(जि. हिंगोली) : टोकाई ते गिरगाव रस्त्याचे काम मागील काही महिन्यांपासून सुरु असून या रस्त्यावर खाजमापूरवाडी शिवारात पूल बांधण्यासाठी खड्डा खोदण्यात आला आहे. याच खड्ड्यात २७ मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास मोटारसायकलसह पडून दोघांचा मृत्यू झाला. केदार विलास रायवाडे (वय २२, रा. गिरगाव), परमेश्वर विश्वनाथ बुरफुटे (वय ३०, रा. गिरगाव) अशी मृतांची नावे आहेत. 

अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी येथे गर्दी केली. गुत्तेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याने नातेवाईकांनी पुलातील पाणी उपसण्याचे काम रोखले होते. जोपर्यंत गुतेदार येत नाही तोपर्यंत पाणी उपसू देणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला होता. दरम्यान, कुरुंद्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, जमादार तुकाराम आमले, वाबळे, आंबेकर, बालाजी जोगदंड आदींनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: Miscalculation in the dark and loss of life, both of them drowned in the pit of the bridge along with the two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.