युवती बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:21 AM2021-07-15T04:21:39+5:302021-07-15T04:21:39+5:30
मुलीचे नाव सविता प्रभाकर अंभोरे असून, १४ रोजी सकाळी ८ वाजेपासून ती बेपत्ता आहे. अंगावर पंजाबी ड्रेसमध्ये चॉकलेटी टॉप ...
मुलीचे नाव सविता प्रभाकर अंभोरे असून, १४ रोजी सकाळी ८ वाजेपासून ती बेपत्ता आहे. अंगावर पंजाबी ड्रेसमध्ये चॉकलेटी टॉप व गुलाबी रंगाची पॅन्ट आहे. बांधा मध्यम व चेहरा लांबोळा असल्याचे म्हटले आहे.
महिला बेपत्ता
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील ब्रह्मवाडी येथील ३२ वर्षीय महिला ११ जुलैपासून बेपत्ता झाल्याची तक्रार सेनगाव पोलीस ठाण्यात दिली. शीला कांबळे असे तिचे नाव असून, उंची ५.५ फूट, रंग काळासावळा, उजव्या हातावर अशोक असे गोंदलेले आहे. आढळल्यास संपर्काचे आवाहन केले.
पत्नीसह तिच्या भावाला मारहाण
हिंगोली : शहरातील दत्तात्रयनगर भागात पतीने पत्नीसह तिच्या भावास मारहाण केल्याची घटना १३ रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली. याबाबत पत्नी सोनाली वाघमारे हिने दिलेल्या तक्रारीवरून गजानन वाघमारेविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले.
नालीवरून मिस्त्रीस मारहाण
हिंगोली : वसमत तालुक्यातील बाराशिव येथे घरासमोरील नाली बंद करून ही बाब सरपंचांना का सांगितली म्हणून बांधकाम मिस्त्रीस मारहाण केल्याची घटना १४ रोजी दुपारी २ वाजता घडली. याबाबत भगवान जाधव यांच्या तक्रारीवरून अनिल वामन जोंधळे व मनीष अनिल जोंधळे या दोघांवर हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
शेतीच्या वादातून मारहाण
हिंगोली : तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे शेतीच्या वादातून एकास तिघांनी मारहाण केल्याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. याबाबत विठ्ठल कऱ्हाळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, शेतातून का जाता असे विचारल्याने शंकर बळीराम कऱ्हाळे, नारायण कऱ्हाळे, भगवान कऱ्हाळे यांनी खोऱ्याचे दांडके, लोखंडी रॉडने मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली.
रस्त्यात वाहन उभे केल्याने गुन्हा
हिंगोली : औंढा नागनाथ येथे नवीन बसस्थानकासमोर रस्त्यात जीप उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने एकावर गुन्हा नोंद करण्यात आला. अनंता कदम याने जीप क्र. एमएच २२-४४७१ ही रस्त्यात उभी करून वाहतुकीस अडथळा केला. पोकाॅ राजकुमार सुर्वे यांच्या फिर्यादीवरून औंढा पोलिसात गुन्हा नोंद झाला.