आमदार संतोष बांगर पुन्हा 'हातघाई'वर, प्राचार्यांना मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 12:23 PM2023-01-25T12:23:59+5:302023-01-25T12:24:43+5:30

याप्रकारावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेऊन कारवाई करू अशी प्रतिक्रिया दिली आहे.

MLA Santosh Bangar again in controversy, the video of beating the principal goes viral in Hingoli | आमदार संतोष बांगर पुन्हा 'हातघाई'वर, प्राचार्यांना मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

आमदार संतोष बांगर पुन्हा 'हातघाई'वर, प्राचार्यांना मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

हिंगोली: बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार संतोष बांगर यांनी मारहाण केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हिंगोली येथील तंत्रनिकेतनमधील हा व्हिडीओ असून आ. बांगर प्राचार्यांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. 

कळमनुरीचे आमदार संतोष बांगर त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे कायम चर्चेत असतात. कधी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यास मारहाण तर कधी अधिकाऱ्यास फोनवरून धमकावणे, अशा घटना सातत्याने पुढे आल्या आहेत. यावेळीही व्हायरल व्हिडीओमध्ये आमदार बांगर एका कार्यालयात असून समोरील व्यक्तीस चोप देत असल्याचे दिसत आहे. ही घटना मागील आठवड्यातील असून हा व्हिडीओ हिंगोली येथील तंत्रनिकेतनमधील आहे. येथील प्राचार्यांच्या विरोधात महिला प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. यावरून आ. बांगर प्राचार्यांच्या कार्यालयात पोहचले. यावेळी  प्राचार्यांवर आ. बांगर यांनी  हातउचला असल्याची माहिती आहे. 

आ. बांगर यांच्याकडून सातत्याने बळाचा वापर केला जात आहे. यापूर्वीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतरही पुन्हा आ. बांगर यांचा मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला. यामुळे आता यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेऊन कारवाई करू अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी याप्रकारावरून शिंदे गटावर निशाणा साधत टीका केली आहे. 

Web Title: MLA Santosh Bangar again in controversy, the video of beating the principal goes viral in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.