'उद्धव ठाकरेंनी काल वेड्यांची जत्रा भरवलेली'; संतोष बांगरांनी हिंगोलीतील सभेवर स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 01:33 PM2023-08-28T13:33:02+5:302023-08-28T13:34:53+5:30

काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीत सभा घेतली.

mla Santosh Bangar criticized on uddhav thackeray | 'उद्धव ठाकरेंनी काल वेड्यांची जत्रा भरवलेली'; संतोष बांगरांनी हिंगोलीतील सभेवर स्पष्टच सांगितलं

'उद्धव ठाकरेंनी काल वेड्यांची जत्रा भरवलेली'; संतोष बांगरांनी हिंगोलीतील सभेवर स्पष्टच सांगितलं

googlenewsNext

हिंगोली- काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीत सभा घेतली. यावेळी ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्यावर जोरदार टीका केली. या सभेवर आता आमदार बांगर यांनी प्रत्युत्तर दिले. 'उद्धव ठाकरे यांची काल झालेली सभा म्हणजे वेड्यांची जत्रा होती, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आम्हा सर्वांचे बाप होते, त्यामुळे आमचा बाप चोरला असं कुणीही म्हणू नये, असं प्रत्युत्तर बांगर यांनी दिले. 

'राज्यातील जनता स्वाभिमानी, बीडमध्ये सत्तेचा वापर; रोहित पवारांचा दादा गटावर पलटवार

काल हिंगोलीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. या टीकेला आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर येत आहेत. आमदार संतोष बांगर यांनीही प्रत्युत्तर दिले. 

आमदार संतोष बांगर म्हणाले, जमा केलेली लोक एकनिष्ठ नाहीत. जिल्हा प्रमुखांनी अनेक पक्ष बदलली आहेत. उद्धव ठाकरेंनी काल वेड्यांची जत्रा गोळा केली होती. या लोकांच्यामुळे आमच्या शिवसेनेवर काहीही फरक पडणार नाही, असं प्रत्युत्तर आमदार बांगर यांनी दिलं. 

आज आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रेचे आयोजन केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.  उद्धव ठाकरेंनी आता आपला बाप चोरल्याचे म्हणणे बंद करावे. बाळासाहेब ठाकरे आमचे सर्वांचे आहेत. त्यामुळे कुणीही एकाने ते आमचे बाप असल्याचा दावा करू नये, असंही बांगर म्हणाले. 

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम राज्यातील जनता पाहत आहे. त्यामुळे शिंदेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील. आम्ही सत्तेत राष्ट्रवादीसोबत बसलो. पण राष्ट्रवादी स्वतः या सत्तेत सहभागी झाली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व मान्य केले, उद्धव ठाकरेंनी आमच्या कावड यात्रेतील गर्दी पहावी. त्यानंतर आपल्या छातीवर हात ठेवून ही ताकद कुणाची हे सांगावे, असं आवाहनही बांगर यांनी केलं. 

Web Title: mla Santosh Bangar criticized on uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.