हिंगोलीत अभियंत्यांच्या खुर्चीला मनसेने घातला हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:48 PM2017-12-22T23:48:32+5:302017-12-22T23:48:41+5:30
तालुक्यातील पिंपळखुटा येथे दोन महिन्यांपासून रोहित्र नसल्याने ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मनसेच्या वतीने २२ डिसेंबर रोजी विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ढोल बजावो आंदोलन करुन कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला हार घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील पिंपळखुटा येथे दोन महिन्यांपासून रोहित्र नसल्याने ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मनसेच्या वतीने २२ डिसेंबर रोजी विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ढोल बजावो आंदोलन करुन कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला हार घातला.
अद्याप बहुतांश गावांतील रोहित्राचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे विविध पक्षाच्या वतीने विद्युत वितरण कार्यालयावर मोर्चे केले, त्यामुळे मोजक्याच गावांना रोहित्र मिळाले आहे. मात्र अजूनही दुर्लक्षित गावांत रोहित्रच नसल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. त्यामुळे रोहित्राच्या मागणीसाठी ग्रामस्थ आले होते.
त्यांना प्रत्येकवेळी वेगवेगळ्या तारखा दिल्या जात असल्याने संतप्त ग्रामस्थांनी मनसेच्या वतीने ढोल बजावो आंदोलन करुन अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घातला.