नियमित पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी 'मनसे'चे जलकुंभावर चढून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 02:37 PM2020-10-16T14:37:19+5:302020-10-16T14:39:14+5:30

MNS Agitation शहरात दररोज पाणी पुरवठा व स्वच्छता करण्याची मागणी

MNS's agitation on Jalkumbh demanding regular water supply | नियमित पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी 'मनसे'चे जलकुंभावर चढून आंदोलन

नियमित पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी 'मनसे'चे जलकुंभावर चढून आंदोलन

Next
ठळक मुद्देआंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले

कळमनुरी : शहरात दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, शहरात स्वच्छता ठेवावी या मागणीसाठी मनसेतर्फे पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून १६ आॅक्‍टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान आंदोलन केले. 

मागील कित्येक दिवसांपासून कळमनुरी शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. नळाला अवेळी पाणीपुरवठा केला जातो. तसेच कित्येक मजुरांना पिण्याच्या पाण्यासाठी नळाची वाट पाहावी लागत आहे. रात्री-बेरात्री नळाला पाणी सोडल्या जात आहे. तसेच मागील कित्येक दिवसांपासून चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच शहरातील कचरा उचलण्यासाठी तीन घंटागाडी आहेत, त्यामुळे शहरात जमा होणार कचरा वेळीच उचलला जात नसल्याने घाणीचे साम्राज्य वाडत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. यामुळे मनसेच्या वतीने १६ आॅक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. 

यावेळी नपचे अभियंता डाखोरे म.जाकीर यांनी आंदोलन कर्ते मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद बांगर, सादिक पठाण,सोनू वाढवे, करण वाढवे यांचीशी चर्चा करत व नवीन पाण्याची टाकी दोन महिन्यांमध्ये सुरू करण्यात येईल व नळाला दररोज पाणीपुरवठा केला जाईल, तसेच शहराची साफसफाई नियमितपणे करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आंदोलन कर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेत कलम ६९ नुसार नोटीस देत सोडून देण्यात आल्याची माहिेती सपोनि श्रीनिवास रोयलावार यांनी दिली.

Web Title: MNS's agitation on Jalkumbh demanding regular water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.