आता शिक्षकांना वर्गावर मोबाईलबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 04:53 PM2019-12-25T16:53:09+5:302019-12-25T16:54:01+5:30

जि.प.सह खाजगी अनुदानित, विनाअनुदानितलाही आदेश

Mobile ban to teachers on the classroom | आता शिक्षकांना वर्गावर मोबाईलबंदी

आता शिक्षकांना वर्गावर मोबाईलबंदी

Next
ठळक मुद्देशिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

हिंगोली :  वर्गावर असताना शिक्षक मोबाईलवर व्यस्त राहात असल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. शासन निर्णयानुसार जि.प., खाजगी अनुदानित, विनाअनुदानित सर्वच शाळांत वर्गावर असताना शिक्षकांना मोबाईलबंदी केली आहे.

२३ डिसेंबर रोजी शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. सध्या जिल्हाभर गुणवत्तावाढीसाठी शिक्षण विभागासह सीईओ एच.पी.तुम्मोड प्रयत्न करताना दिसत आहेत. यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वीच पथक शाळेवर धडकत आहे. गुरुजी शाळेवर वेळेवर येतात की नाही, यापासून ते त्यांनी अध्ययनस्तर निश्चितीत दिलेली गुणवत्ता फुगवटा तर नाही, याचीही तपासणी केली जात आहे. जेथे फुगवटा आढळला तेथे लागलीच समज देवून सुधारणा न केल्यास कारवाईचा इशाराही देत आहे. या दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी शिक्षकांचा वर्गावरील मोबाईलही चर्चेचा विषय होता. डिजिटल वर्गात काही वेळा शिक्षकांना मोबाईलची गरज भासते. अशावेळी मुख्याध्यापकांच्या परवानगीने मोबाईल वापरता येणार आहे. मात्र त्यावरून संभाषण साधता येणार नाही. जि.प.च्याच नव्हे, तर सर्वच शाळांना हा निर्णय लागू केल्याने खाजगी शाळांतही त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. खाजगी शाळांचे शिक्षक बहुतेकवेळा त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याच्या थाटातच वावरत असतात.

गुणवत्तावाढीच्या उपक्रमासाठी निर्णय
मुख्याध्यापकाच्या परवानगीविना वर्गावर मोबाईल नेल्यास संबंधित शिक्षकांना २८ मे २0१५ च्या शासन परिपत्रकातील मुद्दा क्र.३ नुसार दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. शिवाय सेवापुस्तिकेतही लाल शाईने नोंद घेण्याची कारवाई करता येते, असा इशाराही या पत्रात दिला आहे. २00४, २00९ व २0१५ मध्ये मोबाईल वापरावरून शासनाने वारंवार शिक्षण विभागा सूचना दिल्या आहेत. मात्र त्याचे पालन अनेक ठिकाणी होत नाही. आता गुणवत्तावाढीच्या दृष्टिने होत असलेल्या प्रयत्नांना खीळ बसू नये म्हणून पुन्हा मोबाईल वापरावर बंदीचा आदेश समोर आला आहे. 

Web Title: Mobile ban to teachers on the classroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.