वसमत रेल्वे स्टेशनमध्ये मॉकड्रील; पोलीस, दंगाकाबू पथकाची तपासणी, प्रवास्यांचा उडाला गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2023 04:38 PM2023-07-07T16:38:25+5:302023-07-07T16:40:56+5:30

अचानक पोलिसांची कारवाई सुरु झाल्याचे पाहून प्रवासी चांगलेच गोंधळून गेले होते.

Mockdrill in Wasmat Railway Station; Police, riot control squad check, passengers riot | वसमत रेल्वे स्टेशनमध्ये मॉकड्रील; पोलीस, दंगाकाबू पथकाची तपासणी, प्रवास्यांचा उडाला गोंधळ

वसमत रेल्वे स्टेशनमध्ये मॉकड्रील; पोलीस, दंगाकाबू पथकाची तपासणी, प्रवास्यांचा उडाला गोंधळ

googlenewsNext

वसमत (हिंगोली) : सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शहर पोलिसांनी आज सकाळी ११ वाजता रेल्वे स्थानकावर मॉकड्रील गेले. यावेळी पोलिसांनी स्थानक, रेल्वे डब्यांचीही तपासणी केली. दरम्यान, अचानक पोलिसांची कारवाई पाहून प्रवासी चांगलेच गोंधळून गेले होते.

वसमत शहरातील रेल्वेस्टेशनवर पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपान शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस चंद्रशेखर कदम यांच्यासह सपोनि पांडुरंग बोधणापोड, फौजदार राहुल महीपाळे, जमादार शेख हाकीम, गजानन भोपे आदींनी तपासणी केली. पोलिसांसोबत ‘दंगाकाबू’ पथकही तैनात करण्यात आले होते.

सकाळी ११ वाजेदरम्यान वसमत शहर पोलिसांनी रेल्वे स्थानकात जाऊन अचानक तपासणी सुरु केली. हा प्रकार सर्व प्रवासी आचंबित होऊन पाहत होते. पोलीस प्रवाशांच्या सामानाची तपासणीही करत होते. कुठून आले? कुठे जायचे? इथे किती वेळापासून आहात? कोणाला भेटायला आले आहात? तिकीट काढले आहे का? तुमच्यासोबत कोण कोण आहे? असे एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार पोलिस करीत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. रेल्वे स्थानकात अचानक पोलिस का आले असावेत? हे कोणालाही कळाले नाही. पोलिस ज्यावेळेस स्थानकात आले होते. पोलिसांनी तपासणी पूर्ण झाल्यावर रेल्वे स्टेशन मास्टरची भेट घेतली.

सुरक्षिक्षततेच्या दृष्टीने तपासणी
पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वसमत शहर पोलिसांनी तपासणी केली. यावेळी रेल्वे स्टेशनमध्ये जावून डबे व इतर जागेची पाहणी केली. दरम्यान, प्रवाशांच्या सामानाची तपासणी केली. प्रवाशांचे तिकीटही तपासले.
- चंद्रशेखर कदम, पोलिस निरीक्षक वसमत.

Web Title: Mockdrill in Wasmat Railway Station; Police, riot control squad check, passengers riot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.