शील, सदाचार हाच उन्नतीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:19 AM2018-02-13T00:19:41+5:302018-02-13T00:20:20+5:30

शील, सदाचार हाच उन्नतीचा मार्ग आहे. समाजापुढे आदर्श निर्माण करायचा असेल, किंवा सामाजिक, राजकीय, आर्थिक कुठल्याही चांगल्या क्षेत्रात, कार्यात यश संपादन करायचे असेल तर शील, सदाचार व चारित्र्य यांचे पालन केले पाहिजे. असे हिंगोली येथील जेतवन बौध्दविहार शांतीनगर येथे १२ फेबु्रवारी रोजी आयोजित सोळाव्या धम्म परिषदेत प्रवचन देताना भन्ते उपगुप्त महास्थविर यांनी सांगितले.

 Modesty is the path of growth | शील, सदाचार हाच उन्नतीचा मार्ग

शील, सदाचार हाच उन्नतीचा मार्ग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शील, सदाचार हाच उन्नतीचा मार्ग आहे. समाजापुढे आदर्श निर्माण करायचा असेल, किंवा सामाजिक, राजकीय, आर्थिक कुठल्याही चांगल्या क्षेत्रात, कार्यात यश संपादन करायचे असेल तर शील, सदाचार व चारित्र्य यांचे पालन केले पाहिजे. असे हिंगोली येथील जेतवन बौध्दविहार शांतीनगर येथे १२ फेबु्रवारी रोजी आयोजित सोळाव्या धम्म परिषदेत प्रवचन देताना भन्ते उपगुप्त महास्थविर यांनी सांगितले.
यावेळी पुज्य भदंत धम्मसेवक महास्थविर, पु. भन्ते काश्यप महाथेरो, पु. भन्ते महाकाश्यप महाथेरो, पु. भन्ते आनंदबोधी महाथेरो, पु. भन्ते शिवलीबोधी थेरो, पु. भन्ते ज्ञानरक्षित थेरो, पु. भन्ते प्रज्ञापाल, पु. भन्ते पय्याबोधी, पु. भन्ते पय्यानंद, पु. भन्ते आनंदकीर्ती, पु. भन्ते कीर्तीबोधी, पु. भन्ते संघशिल, पु. भन्ते श्वेतबोधी, पु. भन्ते प्रज्ञाबोधी, पु. माताजी बुध्दकन्या, पु. भन्ते बोधीप्रिया, पु. भन्ते पट्टीसेन, पु. भन्ते उदितानंद, पु. भन्ते महाविरो, पु. भन्ते धम्मदीप, पु. भन्ते बुध्ददीप, पु. भन्ते उपगुप्त, पु. भन्ते संघप्रिय आदीं उपस्थित होते. बौध्द धम्म परिषदेस शहरासह ग्रामीण भागातून समाजबांधव तसेच नागरिकांची मोठी गर्दी होती. धम्म परिषदेत पुज्य भन्ते यांनी उपस्थितांना गौतम बुध्दांनी सांगितलेला मार्ग या विषयावर प्रवचन दिले.
यावेळी जि. प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, सरपंच अनुप लुंगे, जी. के. इंगोले, अंबादास वानखेडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक भन्ते काश्यप महाथेरो, सुत्रसंचलन भन्ते धम्मशील तर आभार प्रकाश इंगोले यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुप्रिया महिला मंडळ तसेच संयोजन समितीच्या वतीने परिश्रम घेण्यात आले.

Web Title:  Modesty is the path of growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.