अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:03 AM2019-01-28T01:03:27+5:302019-01-28T01:03:43+5:30

‘माझ्याशी लग्न कर नाही केलंस तर तुला कॅनलमध्ये फेकून देतो. तुझ्या घरच्यांना जिवे मारून तुकडे करतो, दुसऱ्यासोबत लग्न केलस तर तुझ लग्न मोडतो’ अशा धमक्या देत एका अल्पवयीन मुलीवर शेतात नेऊन विनयभंग केला.

 Molestation of minor girl | अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : ‘माझ्याशी लग्न कर नाही केलंस तर तुला कॅनलमध्ये फेकून देतो. तुझ्या घरच्यांना जिवे मारून तुकडे करतो, दुसऱ्यासोबत लग्न केलस तर तुझ लग्न मोडतो’ अशा धमक्या देत एका अल्पवयीन मुलीवर शेतात नेऊन विनयभंग केला. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत २५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील दाती येथील एका तरुणाने गावातीलच शिक्षण घेणाºया १७ वर्षीय मुलीला त्रास दिला. तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुला गावाशेजारच्या कॅनलमध्ये फेकून देतो. तुझे भाऊ बहिणीचे तुकडे करून जिवे मारून टाकतो. माझ्याशिवाय इतर कोणासोबत तुझे लग्न झाले तर मी तेथे जाऊन तुझे लग्न मोडतो. असे म्हणून वाईट उद्देशाने मुलीला शेतात नेऊन हात धरुन खाली पाडले व विनयभंग केला. सदर घटना २५ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दाती शिवारातील गावालगतच्या सूर्यवंशी यांच्या शेतात घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फियार्दीवरून आरोपी सोनबा प्रकाश चीत्तेवार विरुद्ध भादंवि कलम ३५४ (अ) (ड), ५०६ व पोस्को कायदा कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि सविता बोधनकर करीत आहेत.

Web Title:  Molestation of minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.