जिल्हा कचेरीसमोरील धरणे आंदोलनास एक महिना पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 11:56 PM2018-04-05T23:56:56+5:302018-04-05T23:56:56+5:30
कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथे मग्रारोहयोंतर्गत मजूरांना काम उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी जिल्हा कचेरीसमोर सुरु केलेल्या धरणे आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला असला तरीही अद्याप प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधीनी यामध्ये लक्ष घातलेले नाही.
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथे मग्रारोहयोंतर्गत मजूरांना काम उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी जिल्हा कचेरीसमोर सुरु केलेल्या धरणे आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला असला तरीही अद्याप प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधीनी यामध्ये लक्ष घातलेले नाही.
जिल्ह्याची निर्मित्ती झाल्यापासून हे एकमेव धरणे आंदोलन एवढे दिवस जिल्हाकचेरी समोर सुरु आहे. उपजिल्हाधिकारी यांना २५ आॅक्टोबर २०१७ रोजी प्रत्यक्ष भेटून त्यांनी काम उपलब्ध करुन दिले नाही. त्यामुळे त्यांच्यावरही कार्यवाही करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. चिमुकल्यासह सुरु असलेल्या धरणे आंदोलनकर्ते संतापले असून, अद्याप त्यांना नाय मिळालेला नाही. आई- वडिला सोबत असलेल्या चिमुकल्यांनी जिल्हाकचेरी परिसरात असलेल्या झाडा झुडपात घरटे करुन खेळत आहेत. तर दुसरीकडे मात्र आंदोलन कर्ते प्रशासनाच्या निर्णयाची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत.