हिंगोली जिल्ह्यातील आणखी २३६ गावे हगणदारीयुक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:54 PM2017-12-27T23:54:59+5:302017-12-27T23:55:04+5:30

जिल्ह्यात हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींसाठी जि.प. प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मागील सहा महिन्यांत चांगलीच गती आली होती. डिसेंबरअखेर जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जीवतोड प्रयत्न केल्याने १८५ गावे त्यात यशस्वी झाली तर २३६ गावे अजूनही शिल्लकच आहेत.

More than 236 villages in Hingoli district are halting the people | हिंगोली जिल्ह्यातील आणखी २३६ गावे हगणदारीयुक्तच

हिंगोली जिल्ह्यातील आणखी २३६ गावे हगणदारीयुक्तच

googlenewsNext
ठळक मुद्देमुदत संपायला चार दिवस शिल्लक : ३२७ गावांनी केला हागणदारीमुक्तीचा संकल्प पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींसाठी जि.प. प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मागील सहा महिन्यांत चांगलीच गती आली होती. डिसेंबरअखेर जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जीवतोड प्रयत्न केल्याने १८५ गावे त्यात यशस्वी झाली तर २३६ गावे अजूनही शिल्लकच आहेत.
हिंगोली जिल्ह्यात एकूण ५६३ ग्रा.पं. आहेत. गतवर्षीच्या मिळून एकूण ३२७ ग्रा.पं. आता हागणदारीमुक्त झाल्या आहेत. यात औंढा ना.८८, हिंगोली-८0, वसमत-६६, कळमनुरी-६२ तर सेनगावातील ३१ ग्रा.पं. हागणदारीमुक्त झाल्या आहेत. मात्र औंढा-१३, हिंगोली-३१, वसमत-५३, कळमनुरी-६३, सेनगाव-७६ अशा २३६ ग्रा.पं.मध्ये हागणदारीमुक्ती होणे बाकी आहे.
जिल्ह्यात २0१२ च्या सर्वेनुसार १.८१ लाख कुटुंबसंख्या होती. यापैकी १.५४ लाख कुटुंबांकडे शौचालय होते. तर २७ हजार कुटुंबांकडे शौचालय नव्हते. आता ३१ डिसेंबरपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी दररोज ४५00 शौचालयांचे बांधकाम झाले तरच ते शक्य आहे. मात्र वाढलेली कुटुंबसंख्या लक्षात घेता यंदा ८५ हजार शौचालय बांधकामांचे उद्दिष्ट होते. यापैकी ५८३१३ बांधले आहेत. तर आता जिल्ह्याचे काम ५८.0८ टक्के पूर्ण झाले आहे. यात औंढा व हिंगोली या दोनच तालुक्यांची कामगिरी समाधानकारक आहे. इतरांची मात्र पन्नास टक्के ते त्यापेक्षा कमीच प्रगती आहे. सेनगाव तालुक्यात तर अवघे २९ टक्के काम झाल्याने या तालुक्याला हागणदारीमुक्त होणेच नाही की काय, असे चित्र आहे.

Web Title: More than 236 villages in Hingoli district are halting the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.