वैधपेक्षा अवैध जोडण्याच आढळल्या जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:02 AM2017-11-30T00:02:33+5:302017-11-30T00:02:37+5:30

मागील अनेक दिवसांपासून शेतकºयांचे रोहित्र जळण्याच्या तक्रारी होत्या. तर रोहित्र बदलून देण्यासाठी शेतकरीही आक्रमक झाले होते. विद्यूत वितरण कंपनीने रोहित्र पुरविल्याने काही प्रमाणात शेतकºयांचे वादळ शांत झाले आहे.

More than found invalid links | वैधपेक्षा अवैध जोडण्याच आढळल्या जास्त

वैधपेक्षा अवैध जोडण्याच आढळल्या जास्त

googlenewsNext
ठळक मुद्देकारवाई करण्याचा सपाटा : रोहित्र जळण्याचा घेतला जातोय शोध; पथक तयार

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील अनेक दिवसांपासून शेतकºयांचे रोहित्र जळण्याच्या तक्रारी होत्या. तर रोहित्र बदलून देण्यासाठी शेतकरीही आक्रमक झाले होते. विद्यूत वितरण कंपनीने रोहित्र पुरविल्याने काही प्रमाणात शेतकºयांचे वादळ शांत झाले आहे. तोच आता रोहित्र जळण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न कंपनीच्यावतीने घेतला जात असता, यामध्ये रोहित्रावर वैध पेक्षा अवैध जोडण्याच जास्त असल्याचे समोर येत आहे.
जिल्ह्यामध्ये रोहित्रावरुन वादळ पेटले होते. एवढेच काय तर विविध पक्ष संघटनेच्यावतीने आंदोलने केल्यानंतर महावितरणने शक्य होईल तेव्हढ्या गावात रोहित्राची दुरुस्ती केली तर काही गावात नविन रोहित्र दिले. काही प्रमाणात रोहित्राचा प्रश्न सुटला असला तरीही रोहित्र जळण्याची कारणे शोधण्यासाठी महावितरण कंपनीने अधिक्षक अभियंत्यासह कर्मचाºयांचे पथक तयार करुन रोहित्रावरील भार तपासला जात आहे. यामध्ये एकट्या हिंगोली तालुक्यात केवळ दोनच रोहित्राची पाहणी केली असता, एकावर सात आणि दुसºया रोहित्रावर १ अवैध जोडणी आढळून आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील इतर रोहित्रावर अजून किती भार असेल याचा शोध पथकाकडून घेतला जात आहे. तर बºयाच भागातील शेतकरी एका - एका कोटेशनवर चार ते पाच विद्यूत मोटारी चालवित असल्याचेही महावितरणकंडून सांगण्यात आले. त्यामुळे रोहित्रावर भार येऊन रोहित्र जळण्याचे प्रकार सर्रास पणे घडत आहेत. मात्र या पथकामार्फत अवैध जोडणीचा शोध घेण्यात येत असून, अवैध जोडणी धारकांच्या विद्यूत मोटारी व वाईर जप्त केला जात करुन त्यांना दंड आकारण्यात येणार आहे.

Web Title: More than found invalid links

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.