आईची काळजी वाढली ; काळजाच्या तुकड्याला कसे पाठवावे शाळेत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:19 AM2021-07-22T04:19:30+5:302021-07-22T04:19:30+5:30
हिंगोली : कोरोना महामारीमुळे काळजाच्या तुकड्याला शाळेत कसे पाठवावे? असा प्रश्न मुलांच्या आईने उपस्थित केला आहे. तसेच तिसऱ्या लाटेची ...
हिंगोली : कोरोना महामारीमुळे काळजाच्या तुकड्याला शाळेत कसे पाठवावे? असा प्रश्न मुलांच्या आईने उपस्थित केला आहे. तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याने भीतीही वाटत आहे.
कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून मुलांची शाळा बंदचं आहे. त्यामुळे मुलांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी शासनाने शाळा सुरू करण्याचे जाहीर केले. तरी कोरोना महामारीमुळे काळजाच्या तुकड्याला शाळेत पाठवावे वाटत नाही, असा प्रतिप्रश्न मुला-मुलींच्या आईने केला आहे.
कोरोना महामारी ओसरत असली तरी, तिसऱ्या लाटेमुळे मुलांना शाळेत पाठविण्याचे धाडस काही होत नाही. काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या असून काळजावर दगड ठेवून आई मुलांना पाठवत आहेत, व लगेच आणत आहे.
जोपर्यत कोरोना महामारी आहे, तोपर्यत शासनाने मुलांच्या जिवाशी खेळू नये, शाळेत मुलगा गेल्यानंतर त्यांची काळजी कोण घेणार? असेही मुलांच्या आईने म्हटले आहे. कोरोनामुळे काळजाच्या तुकड्याला शाळेत पाठवावे वाटत नाही, असेही मुलांच्या आईने म्हटले आहे.
प्रतिक्रिया
शाळा सुरू झाल्या असल्या तरी माझ्या मुलांना शाळेत पाठवावे वाटत नाही. शाळेत पाठविल्यानंतर कोरोना झाला तर कोण जबाबदार राहील? अशावेळी बोलून काहीच मिळत नाही. विशेष म्हणजे शिक्षणही तेवढेच महत्वाचे आहे.
कौशल्याबाई शिंदे
काळजाच्या तुकड्याला शाळेत पाठवून घरात मन लागत नाही. कोरोनाने सर्वत्र भयभित वातावरण करून सोडले असताना मुलांना शाळेत पाठविणे योग्यच नाही. मुले-मुली डोळ्यासमोर असतात याचाच जास्त आनंद आईला असतो.
-मनीषा पतंगे
मुलांना शाळेत काय शाळेच्या उंबरठ्यापर्यंतही पाठवावे वाटत नाही. कोरोना कोरोना महामारी काही सांगून येत नाही. त्यामुळे घाई न केलेली बरी असे प्रत्येक मुला-मुलींच्या आईला वाटते. काळजी आहे पण शिक्षणही गरजेचे आहे.
- सुरेखा कल्याणकर
बॉक्स....
जिल्ह्यात आठवीच्या प्राथमिक शाळा ८७९ असून आठवीचा वर्ग असलेल्या शाळा २७२ आहेत. आजमितीस सर्वच शाळा आपल्याला सुरु करायच्या नाहीत. सद्य:स्थितीत आठवीचा वर्ग सुरु करायचा आहे. आजमितीस या संदर्भात ७० प्रस्ताव आले असून २०२ शाळांचे प्रस्ताव येणे बाकी आहे. शासनाची जशी सूचना येईल त्याप्रमाणे पुढील निर्णय घेतला जाईल.
-संदीप सोनटक्के, शिक्षणाधिकारी
ही घ्या काळजी...
शाळेतील मुलांनी तोंडाचा मास्क काढू नये, कोणत्याही वस्तूला हात लावला तरी साबनाने हात धुणे आवश्यक आहे, घरी असो वा शाळेत सॅनिटायझरचा वापर करावा, शाळेत सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे, शाळेतून घरी आल्यानंतर कपडे धुवायला टाकावे व स्वच्छपणे साबण लावून आंघोळ करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील एकूण शाळा ८७९
शाळेसाठी आलेले प्रस्ताव ७०
प्रस्ताव येणे बाकी २०२