महावितरणमध्ये तांत्रिक सुधारणांना गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:22 AM2018-11-17T00:22:17+5:302018-11-17T00:22:30+5:30
महावितरणने मागील चार वर्षांत विविध कामे करुन बळकटीकरणाच्या कामांना गती दिल्याची माहिती महावितरणचे सूत्रधारी संचालक विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महावितरणने मागील चार वर्षांत विविध कामे करुन बळकटीकरणाच्या कामांना गती दिल्याची माहिती महावितरणचे सूत्रधारी संचालक विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी चार वर्षांच्या कामगिरीबाबतचे पुस्तकही प्रकाशन केले. यावेळी विवेक जोशी, अधीक्षक अभियंता सु.ल.जाधव, खुराणा जिनींगचे दिलीप काळे व शैलेश जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी पाठक म्हणाले, महावितरणकडे दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत आहे. १८ हजार मेगावॅटवरून ती २५ हजार मेगावॅटवर गेली. त्यामुळे सुधारणांचा उपयोग होत असल्याचे दिसून येते. तर काही भागात सौरऊर्जेवर शेतकऱ्यांना वीज देण्याचा प्रयोग करण्यात येत असून त्यांना रात्रीऐवजी दिवसा वीज यामुळे मिळणार आहे. भविष्यात राज्यात इतरत्रही हा प्रयोग करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यामुळे शेतकºयांना आणखी कमी दराने वीज मिळू शकते, असेही सांगितले. तर शेतकºयांना सौरपंपही दिल्याचे त्यांनी सांगितले. आशियातील दुसºया क्रमांकाची वीज क्षेत्रातील ही कंपनी आहे. १.२0 कोटी ग्राहक मोबाईवरून जोडले गेले. आणखी सुधारणा होणार आहेत.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरेही दिली. वीजचोरीमुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण मराठवाड्यात जास्त असल्याचे सांगून रोहित्र वेळेत मिळण्यासाठी सूचना देण्यात येतील, या पलिकडे काही उत्तर नव्हते. तर मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेले वीजजोडण्यांचे अर्ज निकाली निघत नसल्याबाबत ५ हजार जणांना नवीन जोडण्या मिळणार असल्याचे सांगितले. मात्र वीजचोरी रोखण्याबाबत कोणतीच ठोस भूमिका पाठक यांनी येथे मांडली नाही. ती कमी करण्याचा कोणताच उपाय त्यांच्याकडे नव्हता.