दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:32 PM2019-04-03T23:32:45+5:302019-04-03T23:33:18+5:30
येथील न.प.च्या नगर अभियंत्यास शिवीगाळ प्रकरणी न.प. कर्मचाऱ्यांच्या वतीने ३ एप्रिल रोजी दुसºया दिवशीही काम बंद आंदोलन सुरूच ठेवल्यामुळे दिवसभर कामकाज ठप्प होते.
कळमनुरी : येथील न.प.च्या नगर अभियंत्यास शिवीगाळ प्रकरणी न.प. कर्मचाऱ्यांच्या वतीने ३ एप्रिल रोजी दुसºया दिवशीही काम बंद आंदोलन सुरूच ठेवल्यामुळे दिवसभर कामकाज ठप्प होते. उपनगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख यांनी नगर अभियंता धनंजय येस्के यांना २ एप्रिल रोजी शिवीगाळ केली होती. देशमुख यांच्यावर कडक कारवाईची मागणी न.प. कर्मचाऱ्यांनी केली. कारवाई होईपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला. कर्मचाºयांनी जिल्हाधिकाºयांनाही निवेदन दिले.
व्यापारी महासंघातर्फे निवेदन
व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख यांच्याविरूद्ध न.प. कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या खोट्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करू नका, अशी मागणी व्यापाºयांच्या वतीने ३ एप्रिल रोजी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. उपनगराध्यक्ष देशमुख यांच्याविरूद्ध नगराध्यक्षांच्या सांगण्यावरून अभियंत्यांनी खोटी तक्रार दिलेली आहे. कर्मचारी संघटनेचा दबाव टाकून गुन्हा दाखलचे प्रयत्न सुरू आहेत. न.प.च्या गलथान कारभाराविरोधात महासंघाने आंदोलने केली. देशमुख यांच्याविरूद्ध खोटा गुन्हा दाखल करू नये, अशी मागणी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, दिलीप जिंतूरकर, विलास भोसकर, दामूअण्णा शिंदे, नारायण शिंदे, प्रभाकर पतंगे, रावसाहेब शिंदे आदींनी केली.