विस्थापित शिक्षकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:54 PM2018-06-11T23:54:58+5:302018-06-11T23:54:58+5:30
जि. प. शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत अनियमितता झाल्यानेच विस्थापित शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विस्थापित शिक्षकांना पदस्थापना द्यावी या मागणीसाठी सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जि. प. शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत अनियमितता झाल्यानेच विस्थापित शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विस्थापित शिक्षकांना पदस्थापना द्यावी या मागणीसाठी सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक समिती हिंगोलीच्या वतीने बदली विस्थापित शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शासन निर्णयामप्रमाणे करण्यात आलेल्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत अनियमितता झाली. त्यामुळे आता या विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या पदस्थापनेबाबत जिल्हा प्रशासनाने योग्य न्याय देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले जात असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
विस्थापित झालेले शेकडो शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते. पंडित नागरगोजे, विजय राठोड, संजय कावरखे, श्रीराम महाजन, विष्णू क्षीरसागर, डुबेवार आदींनी आंदोलनात सहभागी शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिवाय विविध मागण्यांचे निवेदन यावेळी प्रशासनास सादर करण्यात आले. आंदोलनात महिला शिक्षिकाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
अशी केली अनियमिता
महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने अनियमितता कशा प्रकारे केली आहे, याबाबत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनावर शासन निर्णयामधील अवघड क्षेत्र निश्चितीनंतर समानीकरणाने रिक्त ठेवायाच्या शाळानिहाय जागा शेवटपर्यंत अधिकृत प्रदर्शित केल्या नाहीत. शिवाय शेवटच्या टप्प्यात वॉटस्अपद्वारे मुदत संपण्याच्या दोन दिवस अगोदर प्रसिद्ध करून परत त्यातही बदल केला. तसेच बदली प्रक्रिया राबविताना शासन निर्णयामधील टप्प्यांचे पालन केले नाही. समानीकरणाच्या बदल्या, संवर्ग १ ते ४ हे पाचही टप्पे एकदाच राबवून बदली आदेश २८ मे रोजी निर्गमित केले. त्यामुळेच शिक्षक विस्थापित राहिले.
आॅनलाईन बदली प्रक्रियेत शासन स्तरावरून ४ था व ५ व्या टप्प्यानुसार बदली प्रक्रिया पूर्णपणे पार पाडण्यात येणार आहेत. सदर प्रक्रियेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शिल्लक राहणाऱ्या विस्थापित शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून विस्थापित शिक्षकांना पदस्थापना देण्यात देण्यात येणार आहे. यासंदर्भाचे पत्र देत शिक्षणाधिकाºयांनी समितीला कळविले होते.