हलगी वाजवून बँकेसमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:11 AM2018-07-03T00:11:53+5:302018-07-03T00:12:28+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील भारतीय स्टेट बँकेसमोर भिमशक्ती औंढा तालुका संघटनेच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वाजता हलगी वाजवून आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील भारतीय स्टेट बँकेसमोर भिमशक्ती औंढा तालुका संघटनेच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वाजता हलगी वाजवून आंदोलन करण्यात आले.
प्रधानमंत्री मुद्रालोन योजनेची अंमलबजावणी करून सुशिक्षित बेरोजगारांना छोट्या व्यवसायासाठी कर्ज देणे, शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना जाचक अटी न लावता पीककर्ज देण्यात यावे, २८ जून रोजी बँकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे २ जुलै रोजी ११ वाजता बँकेसमोर हलगी वाजवून आंदोलन करण्यात आले.
मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जवळा बाजार येथील भारतीय स्टेट बँक, महाराष्टÑ ग्रामीण बँक या दोन्ही बँक शाखांना आंदोलकांनी दिला.
या आंदोलनामध्ये रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य सचिव दिनेश हनुमंते, सेना जिल्हा कार्याध्यक्ष बाळू गायकवाड, राष्टÑपाल भालेराव, कृष्णा गायकवाड, करण वाघमारे, शेखर वाघमारे, सुरेश कीर्तने, सागर दीपके, रवी दीपके, राहूल घोडके, प्रमोदराव कुलदीपके, तालुकाध्यक्ष अरविंद मुळे, प्रमोद कुलदीपके, एस.बी.मुळे, सुमेध मुळे, प्रल्हाद गायकवाड, सागर दीपके, पवन खंदारे, राहूल बोडके, राजू ढोकणे आदींचा समावेश होता.