हिंगोली जिल्हा रूग्णालयासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 11:19 PM2018-02-08T23:19:53+5:302018-02-09T10:40:01+5:30
जिल्हा रूग्णालयात झालेल्या ३० लाखांचा अपहार प्रकरणी रिपब्लिकन सेनेतर्फे ८ फेबु्रवारी रोजी जिल्हा रूग्णालयास घरोओ घालून आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा रूग्णालयात झालेल्या ३० लाखांचा अपहार प्रकरणी रिपब्लिकन सेनेतर्फे ८ फेबु्रवारी रोजी जिल्हा रूग्णालयास घरोओ घालून आंदोलन करण्यात आले.
संबधित दोषी अधिका-यांवर कारवाई करून रूग्णालयात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, तसेच रूग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोड यांनी गुरूवारी आंदोलन केले. सरकारी डॉक्टर राजरोसपणे खासगी वैद्यकीय सेवा चालविण्यासाठी दवाखाने त्यांनी नियमबाह्य दवाखाने उघडले आहेत. त्यामुळे रूग्णालयात उपचारासाठी येणाºयां रूग्णांची हेळसांड होत आहे. या डॉक्टरांविरूद्ध कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे, अरूण लहाने, गौतम इंगोले, योगेश धबाले, गोरख खिल्लारे, चंद्रमुनी पाईकराव, नितिन गव्हाने, विनोद जोगदंड, संघपाल खंदारे, नारायण खिल्लारे, बाळू खिल्लारे, सरतापे, राहुल जमदाडे, प्रकाश हनवते, कविता खाडे, अमोल काशिदे, अविनाश मुळे, आकाश मुळे, खंडागळे, बाबूराव घोंगडे, नागनाथ घोंगडे यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.