हिंगोलीत डॉक्टरांनी केले आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:47 AM2018-07-29T00:47:53+5:302018-07-29T00:48:24+5:30
विविध मागण्यांसंदर्भात डॉक्टर असोसिएशनच्या वतीने २८ जुलै रोजी हिंगोली शहरात आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : विविध मागण्यांसंदर्भात डॉक्टर असोसिएशनच्या वतीने २८ जुलै रोजी हिंगोली शहरात आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
केंद्र सरकारने मांडलेले आणि लोकसभेने संसदीय स्थायी समितीकडे पुनर्विलोकनार्थ पाठविलेले राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकास इंडियन मेडिकल असोसिएशन या आधुनिक वैद्यक शास्त्र डॉक्टरांच्या संघटनेने ठाम विरोध केला आहे. सध्याचा भारतीय वैद्यक परिषद कायदा आणि प्रस्तावित विधेयक दोहोंची उद्दिष्टे सारखीच आहेत. मग नवीन कायद्याची गरजच काय? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. आंदोलनामध्ये खाजगी डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक हे, लोकशाहीविरोधी, स्वत:च्याच उद्दिष्टांशी फारकत असणारे, अनेक उपचार पद्धतींची अशास्त्रीय सरमिसळ करणारे व आयुर्वेद, युनानी, होमिओ या उपचार पद्धतींच्या विकासाला मारक, सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने धोकदायक आहे. तर धनदांडग्यांचे हीत जपणारे असल्यामुळे ते संसदेने पूर्णपणे फेटाळायला हवे, अशी मागणी आहे.
आंदोलनात डॉ. जयदीप देशमुख, डॉ. किशन लखमावार, डॉ. स्नेहल नगरे, डॉ. बगडीया, डॉ. भगत, डॉ. चौधरी, डॉ. काबरा, डॉ. तोष्णीवाल, डॉ. घट्टे, डॉ. पवार, डॉ. अमित शहा, डॉ. सत्यनारायण तापडीया यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील डॉक्टर सहभागी झाले होेते.