शाळा सुरू करण्याच्या हालचाली; मग महाविद्यालये का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:21 AM2021-07-15T04:21:33+5:302021-07-15T04:21:33+5:30
हिंगोली : कोविडमुक्त गावांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची मान्यता घेऊन शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत; परंतु महाविद्यालयांबाबतही सांगण्यात ...
हिंगोली : कोविडमुक्त गावांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची मान्यता घेऊन शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत; परंतु महाविद्यालयांबाबतही सांगण्यात आले नसल्याने याबाबत शासनाच्या सूचना आल्यास महाविद्यालये सुरू केली जातील, अशी प्रतिक्रिया प्राचार्यांनी दिली.
दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोरोना महामारीची शक्यता सर्वाधिक तर १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना कमी धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे कोविडमुक्त क्षेत्रांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
सुरुवातीला म्हणजे पहिल्या टप्प्यात शाळांना पालकांसोबत ठराव करून निर्णय घ्यावा लागणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी घरूनच शैक्षणिक साहित्य आणावे लागेल. शैक्षणिक साहित्याची आदलाबदल होऊ द्यायची नाही, याचीही खबरदारी घ्यावी लागणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर सामाजिक अंतरही ठेवावे लागणार आहे. सामाजिक अंतर कसे ठेवणार? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर कर्मचारी वा विद्यार्थी संशयित आढळल्यास रुग्णालयात दाखल करून मदतही घ्यावी लागणार आहे.
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याच्या शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. शासनाने महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली तर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाविद्यालयेही सुरू केले जातील, असेही शहरातील प्राचार्यांनी सांगितले.
शाळा सुरू झाल्यानंतर एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे. दरम्यान, सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर व अँटिजन चाचणीही करून घ्यावी लागणार आहे.
प्राचार्यांची तयारी...
महाविद्यालये सुरू झाल्यास आम्ही सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेऊ; पण शासनाच्या तशा काही सूचना अजून तरी आलेल्या नाहीत. महाविद्यालये सुरू झाल्यावर सामाजिक अंतर, कोरोनाच्या सर्व नियमांचे पालनही करण्यात येईल.
- अशोक लाठी, प्रभारी प्राचार्य
सध्यातरी शासनाचे महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्देश आलेले नाहीत. शासन ज्याप्रमाणे निर्देश देईल, त्यानंतर महाविद्यालये सुरू केली जातील. यादरम्यान कोरोनाच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालनही करण्यात येईल.
- प्राचार्य डॉ. बी. एस. क्षीरसागर
विद्यार्थिही प्रतीक्षेत.....
महाविद्यालये बंद असल्यामुळे अभ्यासावर परिणाम होत आहे. ऑनलाइन वर्ग सुरू असले तरी प्रत्येकाकडे अँड्राॅइड मोबाइल असेलच असे नाही. ग्रामीण भागात तर मोबाइलला रेंजही नसते. महाविद्यालये सुरू केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.
-
कोरोना महामारीमुळे गत दीड वर्षापासून ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. ऑफलाइन वर्ग सुरू केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, एवढे मात्र नक्की. महाविद्यालये सुरू व्हावीत, असे मनापासून वाटते.
जिल्ह्यातील एकूण महाविद्यालय-
एकूण विद्यार्थी संख्या
कला
वाणिज्य
विज्ञान
-