महिला दिनी अंगणवाडी मदतनीसांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:10 AM2018-03-09T00:10:45+5:302018-03-09T00:11:03+5:30
अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्टÑ राज्य अंगणवाडी सेविका व मदनिस संघातर्फे जागतिक महिला दिनी ८ मार्च रोजी जि. प. कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातून अंगणवाडी ताई व मदतनीस मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्टÑ राज्य अंगणवाडी सेविका व मदनिस संघातर्फे जागतिक महिला दिनी ८ मार्च रोजी जि. प. कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातून अंगणवाडी ताई व मदतनीस मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
अंगणवाडी कर्मचाºयांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्ष ठेवावे, ३० एप्रिल २०१४ च्या शासन निर्णयानुसार प्रकल्पातील सेवानिवृत्त झालेल्या सेविका व मदतनीसांना सेवासमाप्तीचा एकरक्कमी लाभ देण्यात यावा, तसेच मयत झालेल्या अंगणवाडी कर्मचाºयांच्या वारसास, इन्शुरन्स क्लेम मिळवून द्यावा, प्रकल्पनिहाय इंधन व प्रवास भत्ता देयकांचा आढावा घेऊन बिल अदा करण्यात यावे. टीएचआर बंद करून त्याऐवजी लाभार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात यावेत. ज्या अंगणवाडी सेविका मदतनिसांचे बँक खात्याशी आधार संलग्नित नाहीत, त्यांचे मानधन अंगणवाडी कार्यालयाकडून अदा करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत. मानधन अदाईचा प्रकल्पनिहाय आढावा घेऊन ज्या प्रकल्पातून मानधन अदा झाले नाही, त्यांना मानधन अदायीची व्यवस्था करावी यासह विविध मागण्यांसंदर्भात संघातर्फे जागतिक महिलादिनी आंदोलन करण्यात आले.
प्रश्न मार्गी लावू - महिला व बालकल्याण सभापती जाधव
जिल्ह्यातील अंणवाडी सेविका, मदनिसांचे मिनी अंगणवाडी सेविकांचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावू, असे महिला व बालकल्याण सभापती रेणुकाताई भानुदास जाधव यांनी सांगितले. उपमुख्य कार्यकारी गणेश वाघ यांच्या दालनात शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात आली.