वित्त आयोगाचा तिसरा हप्ता मिळाल्याने हालचाली गतिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:32 AM2021-02-11T04:32:05+5:302021-02-11T04:32:05+5:30
प्राप्त झालेल्या हप्त्यांपैकी दोन हप्ते हे अनटाईडचे आहेत. तर एक हप्ता टाईड या गटातील आहे. टाईडमध्ये ५० टक्के स्वच्छता ...
प्राप्त झालेल्या हप्त्यांपैकी दोन हप्ते हे अनटाईडचे आहेत. तर एक हप्ता टाईड या गटातील आहे. टाईडमध्ये ५० टक्के स्वच्छता व ५० टक्के पाणीपुरवठा या दोनच कामांवर खर्च करता येतो. अनटाईडला मात्र ग्रामपंचायतच्या गरजेनुसार आराखड्यातील कामे करण्याची मुभा आहे. यात विद्युतीकरण, नाली बांधकाम, स्मशानभूमीचे शेड व सुविधा, गावातील सुशोभिकरण, धोबीघाट, सिमेंट रस्ता, शासकीय शौचालय दुरुस्ती आदी कामे करता येतात. त्यामुळे अनटाईडचे दोन हप्ते आल्याने यंदा ग्रामपंचायतींना निधीची चंगळ झाली आहे.
नवनिर्वाचितांचा फायदा
ग्रामपंचायत निवडणुकीत वारेमाप आश्वासने देऊन निवडून आलेल्यांना सर्व कामे शक्य नसले तरीही काही कामे करून ग्रामस्थांचे समाधान करण्याची संधी वित्त आयोगाच्या निधीने दिली आहे. लवकरच हा निधी ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग होणार आहे. त्यामुळे नवनिर्वाचितांचा फायदा झाला आहे.