बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी खासदार निधीतून पाच लक्ष रुपयांचा विकास निधी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:26 AM2020-12-23T04:26:14+5:302020-12-23T04:26:14+5:30
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत खासदार निधीतून पाच लाख रुपयांचा विकास निधी देण्यात येणार असल्याची ग्वाही खा. हेमंत पाटील यांनी दिली. ...
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत खासदार निधीतून पाच लाख रुपयांचा विकास निधी देण्यात येणार असल्याची ग्वाही खा. हेमंत पाटील यांनी दिली. शिवसेनेच्या वतीने २२ डिसेंबर रोजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी खा. पाटील बोलत होते. संपर्कप्रमुख जाधव यांनी हिंगोली जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा शिवशाही पॅनलचा भगवा फडकायालाच हवा, असे मत मांडले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आ. संतोषराव बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
बैठकीस हिंगोली जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, माजी खासदार शिवाजीराव माने, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे, रमेश शिंदे, शिवसेना समन्वयक दिलीप बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख बाजीराव सवंडकर, उपजिल्हाप्रमुख सुनील काळे, संदेश देशमुख, डी.के. दुर्गे, परमेश्वर मांडगे, उद्धवराव गायकवाड, समाजकल्याण सभापती फकीरराव मुंडे, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, आनंदराव जगताप, साहेबराव देशमुख, बालाजी तांबोळी, कडुजी भवर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रेखाताई देवकते, नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, राम मुळे, प्रवीण महाजन, नंदकिशोर खिल्लारे, बाळासाहेब मगर, भानुदास जाधव, माऊली झटे, श्रीशैल्य स्वामी, राजू चापके, नगरसेवक राम कदम यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.