पीककर्ज वाटप होत नसल्याने खासदारांनी बाेलावली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:30 AM2021-05-26T04:30:18+5:302021-05-26T04:30:18+5:30

आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये गतवर्षी ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त पीक कर्जवाटप झाले असताना हिंगोलीत मात्र ५० टक्के वाटप झाले. यंदा १०० टक्के ...

MPs call a meeting as peak loans are not being distributed | पीककर्ज वाटप होत नसल्याने खासदारांनी बाेलावली बैठक

पीककर्ज वाटप होत नसल्याने खासदारांनी बाेलावली बैठक

Next

आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये गतवर्षी ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त पीक कर्जवाटप झाले असताना हिंगोलीत मात्र ५० टक्के वाटप झाले. यंदा १०० टक्के पीककर्ज वाटप न झाल्यास रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे तक्रार करण्याचा इशारा खा. पाटील यांनी दिला. पीक कर्ज वाटपात सध्या इतर जिल्ह्यांमध्ये बँकांनी आघाडी घेतली असताना हिंगोली जिल्ह्यात बँका कागदी घोडे नाचविण्यात दंग आहेत. या पार्श्वभूमीवर खा. पाटील यांनी मंगळवारी जिल्हा अधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेतली. तसेच सध्या किती पीक कर्ज वाटप झाले, याचा आढावा घेतला. एक दिवसआड बँकांमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मुभा दिली आहे. मात्र, बँका शेतकऱ्यांना प्रतिसाद देत नसल्याचे आढळून आले आहे. याबाबतच्या तक्रारी वाढल्या असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर सेनगाव, गोरेगाव येथील बँकांबाबत गंभीर तक्रारी असल्याचे पाटील यांनी सांगितले. याठिकाणी दलालांमार्फत गेल्याशिवाय शेतकऱ्यांचे पीक कर्ज मंजूर होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत २९ मे रोजी बँकांची बैठकही आयोजित करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली. तसे निवेदनही दिले. त्याचबरोबर सध्या एक दिवस दिलेला असल्याने त्यादिवशी दोन सत्रांमध्ये पीक कर्जाचे प्रस्ताव तयार करून घेण्यास अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सावंत यांना सांगितले. यावेळी महसूल व इतर यंत्रणांची मदत घेण्यासही सांगण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उद्धव गायकवाड, शिवसेना समन्वयक दिलीप बांगर, डॉ. रमेश शिंदे आदींची उपस्थिती होती.

Web Title: MPs call a meeting as peak loans are not being distributed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.