उद्दिष्ट पूर्ण करण्याचा महावितरणचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:37 AM2021-06-09T04:37:39+5:302021-06-09T04:37:39+5:30
हिंगोली : गत महिन्यात वीज ग्राहकांकडे २ कोटी ८ लाख रूपये थकबाकी आहे. आता ५ कोटी ५ लाख रूपयांचे ...
हिंगोली : गत महिन्यात वीज ग्राहकांकडे २ कोटी ८ लाख रूपये थकबाकी आहे. आता ५ कोटी ५ लाख रूपयांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर असून ते पूर्ण करण्याचा संकल्प महावितरणने सोडला आहे. यासाठी अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहेत.
चालू वर्षी २१ एप्रिल ते २१ मे या दरम्यानचे डिमांड ही ५ कोटी ४१ लाख रूपयांची होती. अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने जिवाचे रान करून ३ कोटी ३९ लाख रूपये वसूल केले आहेत. आता चालू महिन्याचे डिमांड हे २ कोटी ९७ लाख रूपयांचे आहे. तर मागील बाकीही २ कोटी ८ लाख रूपये आहे. चालू महिन्याचे उद्दिष्ट हे ५ कोटी ५ लाख रूपयांचे आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस कामाला लागले आहेत.
हिंगोली शहरातील वीजग्राहक संख्या २५ हजार ८९७ आहे. यापैकी १० हजार ४७१ वीज ग्राहकांनी विजेचा भरणा केला आहे. यासंदर्भात २ जून रोजी अधिकारी वर्गाची व्ही.सी. द्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत वीज वसुली संदर्भात सूचनांही देण्यात आल्या. यावेळी मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, कार्यकारी अभियंता रजनी देशमुख, उप कार्यकारी अभियंता दिनकर पिसे, सहायक अभियंता सरोज चंदखेडे, सहायक अभियंता सचिन बेरसले, सहायक अभियंता नितेश रायपुरे आदिंची उपस्थिती होती.
- ग्राहकांनी उशिर न लावता भरणा करावा
वीज ग्राहकांनी वेळेच्या वेळी बीलाचा भरणा केल्यास कोणतीच समस्या निर्माण होत नाही. तेव्हा ग्राहकांनी विजेचे बील हे वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करावे.
- दिनकर पिसे, उप कार्यकारी अभियंता, हिंगोली शहर