स्वच्छता सर्वेक्षणासाठी पालिका अहोरात्र कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:04 AM2018-01-24T01:04:28+5:302018-01-24T01:06:04+5:30
नगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात बक्षीस मिळविण्यासाठी पदाधिकाºयांचीही साथ लाभत असल्याने प्रशासनही अंग झटकून कामाला लागले आहे. रात्रंदिवस या उपक्रमासाठी तयारी केली जात असल्याचे चित्र आहे. दिवसा स्वच्छता अन् रात्री अहवाल बनविण्याची कामे जोरात सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात बक्षीस मिळविण्यासाठी पदाधिकाºयांचीही साथ लाभत असल्याने प्रशासनही अंग झटकून कामाला लागले आहे. रात्रंदिवस या उपक्रमासाठी तयारी केली जात असल्याचे चित्र आहे. दिवसा स्वच्छता अन् रात्री अहवाल बनविण्याची कामे जोरात सुरू आहेत.
हिंगोली पालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात बक्षीस मिळावे, यासाठी लोकसहभागाच्या केलेल्या प्रयत्नांना बºयापैकी यश आले आहे. त्यामुळे शहरातील विविध भागात मुख्य रस्ते, पारंपरिक कचरा टाकण्याची औंढा रोड, महादेव वाडी, रिसाला बाजारचे कॉर्नर आदी ठिकाणे आता साफ दिसू लागले. शहरातील सर्व भागात घंटागाड्या फिरू लागल्या आहेत. ओला व सुका कचरा वेगळा करून टाकण्याची सवय रुजत चालली आहे. एवढे करूनही कुठे कचरा न उचलल्यास नगरपालिकेच्या अॅपवर तक्रारी केल्या जात आहेत. त्याला वेळेत प्रतिसाद दिला जात आहे. जनतेचा या स्वच्छतेच्या जागरात सहभाग वाढू लागला आहे. मकरसंक्रांतीला अनेकांनी डस्टबिनचे वाणात वाटप केले. अनेक स्वयंसेवी संस्था व नागरिकांचा वैयक्तिक सहभागही विविध ठिकाणी घेतलेल्या श्रमदानाच्या मोहिमेनंतर वाढला आहे. काहींनी सीएसआरचा निधीही दिला. यात बँक आॅफ इंडियाने तीन लाखांचे सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशिन व २ हजार डस्टबिन, एचडीएफसी बँकेने सव्वा दोन लाखांच्या कचरा कुंड्या व पाच हजार कापडी पिशव्या, देना बँकेने ३0 हजारांचे सार्वजनिक ठिकाणी बसायचे बेंच, यश डेव्हलपर्स व खालेदभाई यांनी ८0 कचरा कुंड्या, एमडी फॅन्स ग्रुपने २.४0 लाखांच्या ३ हजार डस्टबिनचे वाटप केले. यात ओला व सुका कचºयाच्या समान डस्टबिनची संख्या आहे. अकबर फॅब्रिकेशनने स्वच्छतेचा लोगो असलेला चष्मा दिला आहे. आता कामाच्या तपासणीसाठी पथक येणार असल्याने रात्रंदिवस कर्मचारी काम करीत आहेत. सीओ रामदास पाटील हेही तळ ठोकून बसत आहेत.