कळमनुरी पालिकेत नगरसेविकेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:38 AM2018-08-01T00:38:09+5:302018-08-01T00:40:21+5:30
येथील न.प. कार्यालयात राजकारण पेटले आहे. काल नगरसेविकेविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. नंतर यातच नगरसेविकेच्या तक्रारीवरून वरिष्ठ लिपिक व नगराध्यक्षाविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : येथील न.प. कार्यालयात राजकारण पेटले आहे. काल नगरसेविकेविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. नंतर यातच नगरसेविकेच्या तक्रारीवरून वरिष्ठ लिपिक व नगराध्यक्षाविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
नगरसेविका वनिता गुंजकर यांच्या फिर्यादीवरून देवराव नानाराव बोलके व नगराध्यक्ष उत्तम शिंदे यांच्यावर कलम ३५४, ३५४ (अ), (२) ११४, ३४ भादंविअन्वये गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीतांनी संगनमत करून न.प.कार्यालयात ३० जुलै रोजी संध्याकाळी ४.३० वाजता प्रोसेडींगची मागणी करीत असताना आरोपी देवराव बोलके यांनी मॅडम झेरॉक्स काढून देतो, असे म्हणून कार्यालयीन अधीक्षक यांच्या कक्षासमोरील मोकळ्या जागेत बोलावून वाईट हेतूने विनयभंग केला. तर उत्तम शिंदे यांनी अश्लि भाषेत शेरेबाजी करून जोरजोराने ओरडून सांगून प्रोत्साहन दिले, असे फिर्यादीत म्हटले.
---
कामबंद आंदोलन
दरम्यान, लिपिक डी.एन. बोलके यांना मारहाण प्रकरणी न.प.च्या सर्व कर्मचाºयांनी कामकाज बंद ठेवून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. गुंजकर यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवा. त्यांचे नगरसेवकपद रद्द करा, अटक करा, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. यावेळी न.प. कर्मचारी संघटनेचे जी.के. वाघ, म. मुख्तार, गजानन इंगळे, डी.ए. गव्हाणकर, सुभाष काळे, बी.के. राठोड, ए.डी. दायमा, दरक, म. नदीम म. मगदुम, म. जाकेर आदी उपस्थित होते. ३१ जुलै रोजी दिवसभर न.प.चे कामकाज बंद होते.
---
खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी
कळमनुरी : येथील न.प.चे नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे यांच्याविरूद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गुन्हा मागे घेण्याची मागणी युवा सेनेच्या वतीने ३१ जुलै रोजी तहसीलदार व पोलीस ठाण्याकडे केली आहे. निवेदनात नमुद आहे की, गुंजकर यांनी नगराध्यक्ष व लिपिकाविरूद्ध पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला. तो मागे घ्यावा, नसता रास्ता रोको व तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. निवेदन तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, पोनि जी.एस. राहिरे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख संतोष बांगर, नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, चंद्रकांत देशमुख, सखाराम उबाळे, संतोष सारडा, गोपू पाटील, राजू संगेकर, संभाजी कºहाळे, अनिल भोरे आदी हजर होते.