नगरपालिकेच्या स्वच्छ रँकिंग स्पर्धेचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:27 AM2021-02-12T04:27:55+5:302021-02-12T04:27:55+5:30
मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत एप्रिल ते जानेवारी या कालावधीत शहरातील शासकीय कार्यालय, शाळा, ...
मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत एप्रिल ते जानेवारी या कालावधीत शहरातील शासकीय कार्यालय, शाळा, हॉस्पिटल, हॉटेल, गृहनिर्माण संस्था, मार्केट यांच्यामध्ये स्वच्छ रँकिंग स्पर्धा आयोजित केली होती. एप्रिल ते जानेवारी या कालावधी स्वयंमूल्यांकन फॉर्म भरून घेण्यात आले होते. स्वयं मूल्यांकन फॉर्मच्या आधारे आणि प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छ सर्वेक्षण समितीकडून त्यांचे गुणांकन करण्यात आले.
यात प्रत्येक गटामध्ये प्रथम रँक काढण्यात आला. यामध्ये सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल, हॉटेल श्रीनिवास, आदर्श गृहनिर्माण संस्था, भाजी मार्केट जवाहर रोड, भगत हॉस्पिटल यांनी स्वच्छतेत प्रथम स्वच्छ रँक मिळविली आहे. सर्व विजेत्यांचा हिंगोली पालिका स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. उर्वरित स्पर्धकांना प्रशस्तीपत्र वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.