खून प्रकरणात दोघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:50 AM2018-08-27T00:50:05+5:302018-08-27T00:50:23+5:30

वसमत शहरात शनिवारी रात्री हाणामारीच्या घटनेत एक तरूण जागीच ठार झाला होता. या प्रकरणी मयताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी दोन आरोपीवर गुन्हा नोंदवला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

 In the murder case, | खून प्रकरणात दोघे गजाआड

खून प्रकरणात दोघे गजाआड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : वसमत शहरात शनिवारी रात्री हाणामारीच्या घटनेत एक तरूण जागीच ठार झाला होता. या प्रकरणी मयताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी दोन आरोपीवर गुन्हा नोंदवला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
वसमतमधील मोंढा भागातील बहिर्जी विद्यालयाजवळ असलेल्या पानटपरीवर पानटपरीचालक व राजू चांदू तिकासे (२८) यांच्यात वाद झाला. वादानंतर हाणामारी झाली. हाणामारीत राजू तिकासे हा जागीच ठार झाला होता. शनिवारी रात्री ८ वाजता ही घटना घडली होती. या प्रकरणी मयताची आई पारूबाई चांदू तिकासे यांनी पोलिसात तक्रार दिली. यात तिच्या मुलाला आरोपी मारहाण करत होते. याची माहिती मिळाल्याने आई भांडण सोडवण्यास गेली असता आरोपीने जमिनीवर ढकलून दिले व मुलास बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलगा मरण पावल्याचे नमूद केले आहे.
या तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी खादर व नसीर (पूर्ण नाव माहित नाही) या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक आर.आर. धुन्ने करत आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. जुन्या भांडणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पोलीस तपासात भांडणाचे कारण स्पष्ट होणार आहे. मयत राजू तिकासे हा त्याच्या पत्नीसह भोकर येथे वास्तव्यास आहे. तीन वर्षानंतर तो वसमतला आईला भेटण्यास आला होता. राखी पोर्णिमेसाठी तो रविवारी बहिणीकडे डोंगरकड्याला जाणार होता. मात्र शनिवारी रात्रीच ही घटना घडली. त्याच्या कुटूंबियांचा शोक हृदय हेलावून टाकणारा होता.
न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title:  In the murder case,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.