वसमत तालुक्यात जमिनीतून पुन्हा गूढ आवाज; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: July 12, 2022 12:59 PM2022-07-12T12:59:46+5:302022-07-12T13:00:09+5:30

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात या पूर्वी अनेकवेळा गूढ आवाज आले आहेत.

Mysterious sound again from the ground in Wasmat taluka; An atmosphere of fear among the villagers | वसमत तालुक्यात जमिनीतून पुन्हा गूढ आवाज; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

वसमत तालुक्यात जमिनीतून पुन्हा गूढ आवाज; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

googlenewsNext

कुरुंदा (जि. हिंगोली): वसमत तालुक्यातील  पांगारा शिंदे व शिरळी येथे पुन्हा १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास जमिनीत गूढ आवाज आले. या मुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात या पूर्वी अनेकवेळा गूढ आवाज आले आहेत. काही वेळा आवाजाची तीव्रता जास्त होती. आवाजाची मालिका मागील तीन वर्षांपासून अधून मधून सुरूच राहत आहे. मंगळवारी सकाळी ६.४४ च्या सुमारास पुन्हा पांगरा शिंदे येथे गूढ आवाज आला. परिसरातील  शिरळी, वापटी, कुपटी या गावातही आवाज आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या आवाजाने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान,  जिल्हा प्रशासनाने या पूर्वी या भागात भेटी देऊन आपत्ती काळात काय काळजी घ्यावी या बाबत मार्गदर्शन केले.

Web Title: Mysterious sound again from the ground in Wasmat taluka; An atmosphere of fear among the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.