नाबार्डकडून वार्षिक पतपुरवठा आराखडा जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:21 IST2018-12-19T00:20:59+5:302018-12-19T00:21:20+5:30
जिल्ह्याचा या वषार्चा २ हजार २०१ कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आला.

नाबार्डकडून वार्षिक पतपुरवठा आराखडा जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्याचा या वषार्चा २ हजार २०१ कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आला.
सदर आराखड्यात १ हजार ६२० कोटी रुपये हे कृषी क्षेत्रासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे संचालक श्रीकांत दिक्षीत, प्रकल्प संचालक डॉ. घुले, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, अग्रणी बँक व्यवस्थापक शांताराम सौदल्लू, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक पि. एम. जंगम यांची उपस्थिीती होती. बैठकीत पीककर्ज, मुद्रा बँक, शासकीय कर्ज योजना आदी विषयांचा यावेळी आढावा घेतला.