नाफेडद्वारे खरीप हंगाम तूर नोंदणी करण्याकरिता खरेदी केंद्र निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:37 AM2021-01-08T05:37:09+5:302021-01-08T05:37:09+5:30
हिंगोली येथे प्रगती स्वयंरोजगार सेवा सह. संस्था (जुने जिल्हा रुग्णालयाच्या समोर तोफखाना हिंगोली, केंद्रचालक अमोल काकडे), कळमनुरी येथे कयाधू ...
हिंगोली येथे प्रगती स्वयंरोजगार सेवा सह. संस्था (जुने जिल्हा रुग्णालयाच्या समोर तोफखाना हिंगोली, केंद्रचालक अमोल काकडे), कळमनुरी येथे कयाधू शेतकरी उत्पादक कं. मर्या. (तोंडापूर, वारंगा फाटा ता. कळमनुरी, केंद्र चालक महेंद्र माने) जवळा बाजार येथे औंढा ना. तालुका सह. खरेदी-विक्री संघ मर्या. (जवळा बाजार, केंद्र चालक कृष्णा हरने ), वसमत येथे वसमत तालुका सह. खरेदी-विक्री संघ मर्यादीत (वसमत, केंद्रचालक इंगोले), सेनगाव येथे संत भगवानबाबा स्वयंरोजगार सेवा संस्था (कोथळज, साई ॲग्रो इंडस्ट्रीज जिनिंग फॅक्ट्री, तोष्णीवाल कॉलेज समोर, हिंगोली रोड सेनगाव, केंद्र चालक संदीप काकडे), साखरा येथे विजयालक्ष्मी बेरोजगार सह. संस्था मर्या (कोळसा साखरा ता. सेनगाव, केंद्रचालक उमाशंकर माळोदे) असे आहेत.
शेतकऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी संपर्क करून नोंदणी करावी. नोंदणीकरिता सोबत खरीप हंगाम २०२०-२१ मधील पीक पेरा नोंद असलेला तलाठ्याच्या सही-शिक्यानिशीचा ऑनलाइन सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स सोबत आणावी. बँक पासबुकवर शेतकऱ्याचे नाव, खाते क्रमांक आयएफएससी कोड स्पष्ट असणे आवश्यक आहे. संबंधित तालुक्यातील व तालुक्याला जोडलेल्या केंद्राच्या ठिकाणी तूर हमीभावाने खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकारी परभणी, हिंगोली यांनी केले आहे.