Nagar Panchayat Election Result 2022: औंढ्यात शिवसेनेची बाजी; वंचितच्या जोरदार फाईटचा कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 01:39 PM2022-01-19T13:39:35+5:302022-01-19T13:43:15+5:30
Nagar Panchayat Election Result 2022: वंचितने दिलेल्या कडव्या लढतीमुळे बाणाला ताण मिळाला असून काँग्रेसची फरपट झाली.
हिंगोली : जिल्ह्यात दोन नगर पंचायतींमध्ये धक्कादायक निकाल समोर आले आहेत. औंढा नगर पंचायतीमध्ये अखेर शिवसेनेने बाजी मारली आहे. इथे वंचितने कडवी झुंज दिल्याने अनेक वार्डमधील चित्र बदले आहे. याचा थेट फटका कॉंग्रेस आणि भाजपला झाला असून त्यांच्या प्रत्येकी दोन जागा कमी झाल्या आहेत.
औंढ्यात १७ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये शिवसेना ९, काँग्रेस ४, वंचित २, भाजप २ असे बक्षीय बलाबल राहिले आहे. यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. वंचितने दिलेल्या कडव्या लढतीमुळे बाणाला ताण मिळाला असून काँग्रेसची फरपट झाली. मागच्या तुलनेत काँग्रेस व भाजप प्रत्येकी दोन जागा गमवाव्या लागल्या. तर राष्ट्रवादीच्या दोन जागा कमी झाल्या असून तेवढ्याच जागा मिळवत त्यांची जागा सभागृहात वंचितने घेतली आहे.
औंढ्यात शिवसेनेचे दिलीप राठोड, सपना कनकुटे, शीतल पवार, राजू खंदारे, राहुल दंतवार, जया देशमुख, साहेबराव काळे, अनिल देव, मनोज काळे हे ९ जण निवडून आले. काँग्रेसचे शेख गजाला बेगम शेख अजीज, इनामदार म.असोफ खालेद, कुंता गोबाडे, सुनीता जावळे हे चार जण, भाजपच्या दीपाली पाटील, अश्विनी पाटील, वंचितच्या शेख गोरीबी रशीद, रेश्मा मुहम्मद शफी या निवडून आल्या आहेत.