नागेश्वर नागनाथाची वर्ष प्रतिपदेला अलंकार पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:32 AM2018-03-19T00:32:24+5:302018-03-19T00:32:24+5:30
औंढा नागनाथ : आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या येथील नागेश्वर नागनाथाची गुढी पाडवा वर्ष प्रतिपदेच्या पावन पर्वावर वस्त्रालंकार महापूजा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या येथील नागेश्वर नागनाथाची गुढी पाडवा वर्ष प्रतिपदेच्या पावन पर्वावर वस्त्रालंकार महापूजा करण्यात आली.
गुढीपाडवा असल्याने मराठी नववर्षाची सुरूवात घरोघरी गुडी उभारून करण्यात आली. वर्षातील पहिलाच दिवस असल्याने ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी दूरवरून भाविकांनी हजेरी लावली. पाडव्यानिमित्त नागेश्वरास अभ्यंग स्नान घालून सकाळी ५.३० वाजेपासून सजवण्यात आले होते. यामुळे दिवसभर अभिषेक बंदी होती. दुपारी ४ श्रींची विधीवत महापूजा करून अलंकार चढवण्यात आले. यामध्ये हिरे, मोती, धातूच्या अलंकारांचा समावेश होता.
नागनाथाची अलंकार पूजा ही केवळ ठराविक उत्सवातच करण्यात येत असल्याने श्रींचे हे रूप पाहण्यासाठी मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. सायंकाळपर्यंत दर्शनार्थींची रीघ लागली होती.