नागपंचमी सणाला कोरोनामुळे पडला खंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:34 AM2021-08-14T04:34:44+5:302021-08-14T04:34:44+5:30

औंढा नागनाथ: बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ मंदिरात नागपंचमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची परंपरा पाच हजार ...

Nagpanchami festival fell due to corona | नागपंचमी सणाला कोरोनामुळे पडला खंड

नागपंचमी सणाला कोरोनामुळे पडला खंड

Next

औंढा नागनाथ: बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ मंदिरात नागपंचमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची परंपरा पाच हजार वर्षांपूर्वीपासूनची आहे, परंतु मागील दोन वर्षांपासून या परंपरेला कोरोनामुळे खंड पडला आहे. यंदा भाविकांनी लॉकडाऊन उघडल्यामुळे शिखर दर्शन का होईना, म्हणून थेट औंढा गाठून दर्शन घेतले. काही भाविकांनी घरातच नागपंचमी सण साजरा केला.

औंढा नागनाथ येथे ज्योतिर्लिंग असल्याने नागपंचमी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी शेतकरी वर्ग नागदेवतांची पूजा, आराधना करून, सापांचे तैलचित्र घरावर व देवघरात काढून पूजा करतात. या दिवशी कुठलेही तळीव पदार्थ न खाता, उकडलेले अन्नपदार्थ सेवन करतात, तसेच जागृत देवस्थान असल्या कारणाने सर्पमित्र, तांत्रिक, मांत्रिक या परिसरात मंत्रोच्चार करून, शक्ती प्राप्त करून घेण्यासाठी हजेरी लावतात, परंतु यावेळेस मात्र कोरोनामुळे निर्बंध असल्यामुळे कोणताही कार्यक्रम घेता आला नाही. या ठिकाणी हिंगोली, परभणी या जिल्ह्यात पंचक्रोशीतील वसमत, येळेगाव, बोरजा, पिंपळदरी, सिद्धेश्वर, साळना, लाख, जवळा बाजार, नागेशवाडी आदी गावांतून भाविक अनवाणी पायाने दर्शनासाठी येतात. लॉकडाऊनचे निर्बंध उठल्यामुळे कार्यक्रम घेता येईल, असे वाटले होते. त्या अनुषंगाने नागपंचमीच्या पूर्वसंध्येला धार्मिक कार्यक्रमासाठी अनेक भाविकांनी औंढा गाठले होते, परंतु या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कुठलाही कार्यक्रम, उत्सव साजरा करता आला नाही. केवळ ‘श्री’ चे पायरी व शिखर दर्शन घेऊन भाविकांना परत जावे लागले.

अजूनही यात्रेसाठी परवाने नाही

अनलॉक झाले असले, तरी राज्य शासनाने मंदिर उघडण्याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे या परिसरात गर्दी होऊ नये, म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परवनगी नंतरच भाविकांना मंदिरात नागनाथाचे दर्शन घेता येईल.

- वैजनाथ मुंडे, पोलीस निरीक्षक, औंढा.

Web Title: Nagpanchami festival fell due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.