नानासाहेब देशमुख योजनेत २४० गावांची केली निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:46 AM2018-04-21T00:46:45+5:302018-04-21T00:46:45+5:30
जिल्हा कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या नानासाहेब देशमुख या योजनेत जलसंधारणासह इतर कामे केली जाणार आहेत. यामध्ये एकूण २४० गावांची निवड केली असून, ४ गावांची प्रायोजीक तत्वावर निवड केल्याचे जिल्हाकृषी अधिक्षक विजय लोखंडे यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या नानासाहेब देशमुख या योजनेत जलसंधारणासह इतर कामे केली जाणार आहेत. यामध्ये एकूण २४० गावांची निवड केली असून, ४ गावांची प्रायोजीक तत्वावर निवड केल्याचे जिल्हाकृषी अधिक्षक विजय लोखंडे यांनी सांगितले.
या योजनेंतर्गत जिल्ह्यातला एकूण २० कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून निवड झालेल्या गावात हवामान बदलाशी निगडीत कामे केली जाणार आहेत. तर यासाठी संबंधित गावातील सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली कमीटी निवडली जाणार आहे. त्याची बैठक घेऊन त्या- त्या गावात उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये जलसंधारणासह आदी कामे केली जाणार आहेत. विशेष म्हणजे निवड केलेल्या गावातील ग्रामस्थांच्या म्हणन्या नुकसार उत्पन्न वाढीच्या आधारावर कामे केली जाणार आहेत. तसेच त्या- त्या गावातील शेतकरी, युवकांना विविध व्यवसायासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहेत. प्रायोजिक तत्वावर निवडलेल्या लिंगदरी, जामदया, उमरदरी, गोंडाळा या गावात कामे सुरु केलेली आहेत. या गावातील कामाचे सर्वेक्षण सुरु झाले आहेत. यासाठी औरंगाबाद, हिंगोली येथे बैठका झाल्या असून, कामाचे नियोजनकी करण्यात आल्याचे कृषी अधिक्षक लोखंडे यांनी सांगितले.