जातीवाचक शिवीगाळ; तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:26 AM2018-08-15T00:26:36+5:302018-08-15T00:26:52+5:30
वसमत तालुक्यातील सोमठाणा शिवारातील आखाड्यावर जाऊन आरोपींनी मुंजाजी रंगराव चव्हाण यांना जबर मारहाण करीत दुचाकी पेटवून देत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना १४ आॅगस्ट रेजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांविरूद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कुरूंदा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : वसमत तालुक्यातील सोमठाणा शिवारातील आखाड्यावर जाऊन आरोपींनी मुंजाजी रंगराव चव्हाण यांना जबर मारहाण करीत दुचाकी पेटवून देत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना १४ आॅगस्ट रेजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांविरूद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कुरूंदा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसमत तालुक्यातील किन्होळा येथील मुंजाजी चव्हाण यांच्या शेतातील आखाड्यावर आरोपींनी गोंधळ घालत त्यांचा गळा दाबला व डोक्यात दगड मारून जखमी केले. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून चव्हाण यांची दुचाकी जाळून ५८ हजार ५०० रुपयांचे नुकसान केले. तसेच फिर्यादी चव्हाण यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुंजाजी चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी दत्ता साहेबराव पोले, प्रफुल्ल पोले, साहेबराव पोले (सर्व रा. किन्होळा) या तिघांविरूद्ध अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. घटनास्थळी डीवायएसपी शशिकिरण काशिद, सपोनि शंकर वाघमोडे यांनी भेट देवून पंचनामा केला.