राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:44 AM2019-02-13T00:44:11+5:302019-02-13T00:44:30+5:30
वाढत्या बेरोजगारीत तरुणाई होरपळत असून नोटाबंदीनंतर यात मोठी भर पडल्याने या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा काढण्यात आला. तर गांधी चौकात पकोडे तळून आंदोलन सुरू झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वाढत्या बेरोजगारीत तरुणाई होरपळत असून नोटाबंदीनंतर यात मोठी भर पडल्याने या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा काढण्यात आला. तर गांधी चौकात पकोडे तळून आंदोलन सुरू झाले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बेरोजगारी वाढत असतानाही मोदी सरकार केवळ आश्वासनेच देत असल्याचा आरोप करण्यात आला. तर खोटी आकडेवारी देवून दिशाभूल केली जात आहे. आधीच नवीन रोजगार नसताना नोटाबंदी, जीएसटीत अनेकांचे व्यवसाय बुडाले. त्यामुळे नवीन बेरोजगारांची फौज तयार झाल्याचा आरोपही केला. गांधी चौक येथे पकोडे तळून आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, कार्याध्यक्ष दिलीप चव्हाण, जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे, मतीन कामले, शशिकांत वडकुते, जि.प. सदस्य मनीष आखरे, बालाजी घुगे, सुमित्रा टाले, विद्या चव्हाण, शेख करीमोद्दीन, आप्पासाहेब देशमुख, डॉ.जयदीप देशमुख, नगरसेवक बिरजू यादव, संजय दराडे, तालुकाध्यक्ष माधव कोरडे, शहराध्यक्ष जावेद राज, राजेश गोटे, मतीन इनामदार, देवीदास कºहाळे, शिवाजी शिंदे, कैलाश देशमुख, शेख आयूब, विनोद नाईक, ईश्वर उरेवार, जाकेर शेख, इरफान पठाण, दौलत हुंबाड, निश्चल यंबल, विकास शिंदे, मनोज बांगर, रशीद तांबोली, इमाम बेलदार, सुजय देशमुख, भुतनर, सूरज बांगर, अमोल गंगावणे, अविनाश बांगर, महेंद्र पालवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.