ईपीएस पेन्शनधारकांचे १ जूनला देशव्यापी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:23 AM2021-05-29T04:23:02+5:302021-05-29T04:23:02+5:30
देशांतील विविध महामंडळे, खाजगी उद्योग, सहकार क्षेत्र इत्यादी मध्ये काम केलेल्या सुमारे ६७ लाख ईपीएस ९५ पेन्शनधारक गेल्या ...
देशांतील विविध महामंडळे, खाजगी उद्योग, सहकार क्षेत्र इत्यादी मध्ये काम केलेल्या सुमारे ६७ लाख ईपीएस ९५ पेन्शनधारक गेल्या अनेक वर्षापासून न्यायाच्या अपेक्षेत आहेत. त्यांना फक्त ३०० रुपये ते ३ हजारांपर्यंत पेन्शन मिळते. त्यावर कुठलाही महागाई भत्ता नाही की वैद्यकीय सुविधा नाही. आजपर्यंत राष्ट्रीय संघर्ष समितीचे बॅनरखाली सर्व प्रकारची आंदोलने केलीत, निवेदने दिलीत, संबंधितांच्या भेटी घेतल्यात. पंतप्रधानांनीही आश्वासन दिले. मात्र अद्याप प्रश्न निकाली निघाला नाही. या आश्वासनामुळे पेन्शनधारकांनी आंदोलन तेवढे स्थगित केले होते. बुलडाणा येथे ८८० दिवसांपासून साखळी उपोषण आंदोलन केले. मात्र तरीही दखल नाही. अनेक पेन्शनधारक वाढीव पेन्शनसाठी लढा देतानाच जगही सोडून गेल्याचे म्हटले.
आता आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून १ जून २०२१ रोजी पेन्शनधारक एक दिवसीय राष्ट्रव्यापी उपोषण करणार आहेत. या दिवशी देशांतील ६७ लाख पेन्शनधारक कुटुंबीयांसमवेत सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपवास करतील. तर आपल्या भावना समाजमाध्यमे, ई मेलच्या माध्यमातून कामगार मंत्रालय व पंतप्रधानांना कळविण्यात येणार आहेत. सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी यांनी केले.