रासायनिक खतांच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:31 AM2021-05-20T04:31:31+5:302021-05-20T04:31:31+5:30
याबाबत राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधनांना निवेदनही पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले की, जगाचा पाेशिंदा म्हणवला जाणारा शेतकरी केंद्र शासनाच्या चुकीच्या ...
याबाबत राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधनांना निवेदनही पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले की, जगाचा पाेशिंदा म्हणवला जाणारा शेतकरी केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे त्रस्त आहे. रासायनिक खतांच्या किमती ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत, तर बियाणांच्या किमतीसुद्धा वाजवीपेक्षा जास्त वाढविण्यात आल्या आहेत. इंधन दरवाढीमुळे आधीच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच प्रत्येकाची आर्थिक घडी विस्कटली आहे. कोरोनाच्या संकटाचाही फटका बसला. शेतातच भाजीपाला, फळे वाया गेली. घरगुती गॅसचे दर हजरावर गेले. उज्ज्वला योजनेत फुकट गॅस कनेक्शन देऊन आता अशापद्धतीने वसुली चालविली. त्यामुळे अनेकांनी गॅस बाजूला ठेवून पुन्हा चूल पेटविली आहे. त्यामुळे रासायनिक खतांसह या सर्व बाबींचीही दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन या दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला आहे. तर ही दरवाढ मागे न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, जि. प. उपाध्यक्ष मनीष आखरे, माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे, शहराध्यक्ष स. जावेद राज, बालाजी घुगे, बी. डी. बांगर, सुजय देशमुख, अमित कळासरे, ईश्वर उरेवार, इरफान पठाण, संचित गुंडेवार, महेंद्र ढबाले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.