सेनगावात राष्ट्रवादीचे ‘दार उघडा’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:30 AM2021-01-03T04:30:15+5:302021-01-03T04:30:15+5:30

सेनगाव : येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या मुख्य प्रवेशद्वाराला बँकेकडून कायम कुलूप लावून दैनंदिन व्यवहार केले जात असल्याने ...

NCP's 'Open the Door' movement in Sengaon | सेनगावात राष्ट्रवादीचे ‘दार उघडा’ आंदोलन

सेनगावात राष्ट्रवादीचे ‘दार उघडा’ आंदोलन

Next

सेनगाव : येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या मुख्य प्रवेशद्वाराला बँकेकडून कायम कुलूप लावून दैनंदिन व्यवहार केले जात असल्याने शेतकरी व खातेदारांना सहज प्रवेश नाकारला जात आहे. तसेच बँकेचे अधिकारी अरेरावीची भाषा वापरत असल्याने याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शुक्रवारी बँकेच्या दारात तासभर ठिय्या मांडत ‘दार उघडा’ आंदोलन करण्यात आले.

येथील भारतीय स्टेट बँकेविरोधात सर्वसामान्य ग्राहक, शेतकरी यांच्या कायम तक्रारी आहेत. ग्राहकांना बँक शाखेत निर्धारित वेळेत पीककर्ज मिळत नाही, खाते आधार लिंक करणे, नवीन पासबुक देणे, पासबुकवर व्यवहाराच्या नोंदी न मिळणे यासह इतरही सेवा जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहेत. बॅंकेत आलेल्या ग्राहकांना सन्मानाची वागणूक मिळत नाही, उलट अरेरावीची भाषा वापरली जाते. बँकेच्या शाखेत पीककर्जाचे जवळपास दोन हजार प्रस्ताव पडून असताना बँकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला लाॅकडाऊनपासून असलेले कुलूप आजही कायम आहे. शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी बँकेतील कर्मचाऱ्यांकडे वारंवार विनवणी करावी लागत आहे. याला वैतागून अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी दुपारी १२ वाजता कुलूप बंद प्रवेशद्वारासमोर बसून ‘दार उघडा’ आंदोलन केले. ग्राहकांना बँकेत प्रवेश नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना यावेळी आंदोलनकर्त्यांनी धारेवर धरत मुख्य प्रवेशद्वाराला आता कुलूप लावून ग्राहकांना प्रवेश नाकारण्याची गरजच काय? असा प्रश्न विचारला. त्यानंतर बँक प्रशासनाने यापुढे मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावणार नसल्याचे आश्वासन दिले. तसेच त्रुटीमध्ये असलेल्या पीक कर्जासाठी तातडीने कारवाई करण्यासह ग्राहकांना सन्मानाची वागणूक देणार असल्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र गडदे, नगराध्यक्ष संदीप बहिरे, नगरसेवक उमेश देशमुख, कैलास देशमुख, संदीप देशमुख, गणेश कदम, शिवाजी देशमुख, शिवशंकर देशमुख यांच्यासह ग्रामीण भागातील शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी ग्राहकांच्या समस्यांसंदर्भात निवेदनही देण्यात आले.

फाेटाे आहे.

Web Title: NCP's 'Open the Door' movement in Sengaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.