जवळा पांचाळ गावात ग्रा.पं. निवडणुकीसाठी दुहेरी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:36 AM2021-01-08T05:36:56+5:302021-01-08T05:36:56+5:30
कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ हे गाव राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असून डोंगरकडा ग्रामपंचायतीनंतर जवळा पांचाळ ग्रामपंचायतीकडे पाहिल्या जाते जवळा पांचाळ ग्रामपंचायत ...
कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ हे गाव राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असून डोंगरकडा ग्रामपंचायतीनंतर जवळा पांचाळ ग्रामपंचायतीकडे पाहिल्या जाते जवळा पांचाळ ग्रामपंचायत ही ११ उमेदवारांची ग्रामपंचायत आहे. यावर्षी ग्रामपंचायत उमेदवारासाठी सहा महिला व पाच पुरुष उमेदवारांना संधी मिळाली आहे. ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व असावे यासाठी प्रत्येक जण स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावत आहे. सध्या जवळा पांचाळ गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जोरदार दुहेरी लढत होणार आहे.
अर्ज छाननीनंतर ४ जानेवारी रोजी काही उमेदवारांनी फार्म मागे घेतल्याने आता उरलेल्या २२ उमेदवारांमध्ये दोन पॅनलमध्ये रंगतदार दुहेरी लढत होणार आहे. १५ जानेवारी होत असलेल्या निवडणुकीसाठी आता बैठकांचे सत्र सुरू झाले आहेत. दुसऱ्या पॅनलच्या अपेक्षा आपला पॅनल कसा मजबूत बनेल यासाठी पॅनल प्रमुख रणनीती आखताना दिसत आहे.
सध्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नवीन नवीन चेहऱ्यांची उमेदवारी दाखल होत आहे व तसेच जवळा पांचाळ गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दुहेरी लढत होणार आहे. यामध्ये दोन्ही पॅनलनी आपापली कंबर कसली आहे. यावर्षी जवळा पांचाळ गावातील जवळपास ३,६०० मतदार व चार प्रभाग आहेत. तसेच गेल्या पाच वर्षांचा आराखडा लक्षात घेता जनता मतदान करणार असल्याचे दिसून येत आहे. यंदा होणा-या निवडणुकीत मातब्बर पुढा-यांसमोर तरुणांचे आव्हान असल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यामुळे यंदा मतदार कोणाला कौल देणार, याचा निर्णय निकालावर अवलंबून आहे.