महिलेच्या गळ्यातील गंठण पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:55 AM2019-02-04T00:55:38+5:302019-02-04T00:55:53+5:30
हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील चोरट्यांनी गंठण पळविल्याची घटना हिंगोली शहरातील जिजामातानगर येथे २ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील चोरट्यांनी गंठण पळविल्याची घटना हिंगोली शहरातील जिजामातानगर येथे २ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
हिंगोली शहरातील जिजामातानगर येथे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला जाणाºया महिलेच्या गळ्यातील ६० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी लंपास केले. यावेळी महिलेने आरडा-ओरड करेपर्यंत चोरटे मात्र घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी सोनल केतन सागर या महिलेच्या फिर्यादीवरून हिंगोली शहर ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजबलेल्या वसतीमध्ये चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबविल्याने परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
शहरातील जिजामातानगर परिसरात चोºयांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. येथील परिसरातील काही महिन्यांपुर्वी चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत साहित्य व रोकड चोरून नेल्याच्या घटनाही घडल्या होत्या. जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. चाकूचा धाक दाखवून लुटमारीच्याही दिवसेंदिवस घटनाही वाढत चालल्या आहेत.