नव्या तुरीला बाजारपेठेत ५३०० रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:25 AM2021-01-04T04:25:16+5:302021-01-04T04:25:16+5:30
जवळा बाजारसह परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणावर तुरीचे क्षेत्र आहे. दमदार पावसामुळे तुरीचे पीकही जोमात आले. मात्र, कापणीच्या पूर्वीच ...
जवळा बाजारसह परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणावर तुरीचे क्षेत्र आहे. दमदार पावसामुळे तुरीचे पीकही जोमात आले. मात्र, कापणीच्या पूर्वीच तुरीला वाळवी लागल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे यावर्षी तूर उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला. सध्या बाजारपेठेत नव्या तुरीला प्रतिक्विंटल ५३०० रुपये भाव मिळत असून अजून भाव वाढण्याची चिन्हे आहेत. तसेच याठिकाणी नाफेडच्या वतीने तूर खरेदी केंद्र सुरू होणार आहे. यासाठी ऑनलाईन नावनोंदणी सुरू आहे. शासनाच्या आधारभूत किमतीप्रमाणे तूर खरेदी केंद्रावर प्रतिक्विंटल ६००० रुपये भाव मिळणार आहे. मात्र, काही शेतकरी आर्थिक अडचणीमुळे तूर खासगी बाजारपेठेत कमी दराने विक्री करीत आहेत. या बाजारपेठेत सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे. सध्या सोयाबीनच्या भावात तेजी आली असून सध्या बाजारपेठेत ४३०० रुपये प्रतिक्विंटल भावाने विक्री होत आहे.