दुसऱ्या दिवशी १७ जणांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:40 AM2021-02-27T04:40:34+5:302021-02-27T04:40:34+5:30
रॅपिड अँटीजेन टेस्ट मोहीम २५ फेब्रुवारीपासून राबविण्यात येत आहे. शहरातील किराणा व्यापाऱ्यांच्या २६ फेब्रुवारी रोजी रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात ...
रॅपिड अँटीजेन टेस्ट मोहीम २५ फेब्रुवारीपासून राबविण्यात येत आहे. शहरातील किराणा व्यापाऱ्यांच्या
२६ फेब्रुवारी रोजी रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. जीएसटी कायद्याच्या विरोधात शुक्रवारी भारत बंदचे आवाहन केले होते. या बंदमुळे अनेक किराणा दुकानदार चाचण्या करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात आले नसल्याने संख्या कमी झाल्याचे दिसले.
१७ जणांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये सर्वच चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. कोरोनाचा आजार वाढत चालल्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतराचे पालन करावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, हात वारंवार सॅनिटायझरने स्वच्छ करावेत, असे दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व कोरोनाला हद्दपार करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद मेने यांनी केले आहे.